राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद
![Response to Rashtriya Swayamsevak Sangh's blood donation camp](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/IMG-20210829-WA0007-1-e1630304076847.jpg)
पिंपरी चिंचवड | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक दिवंगत विजयराव पाठक यांच्या पुण्यस्मृती निमित्त आयोजित भव्य रक्तान शिबिराला प्रतिसाद मिळाला. सुमारे 71 जणांनी रक्तदानाची इच्छा व्यक्त केली. प्रत्यक्ष 50 जणांना रक्तदान करता आले.चिखली येथे झालेल्या शिबिराला जिल्हा संघचालक विनोद बन्सल, जिल्हा सहकार्यवाह अमोल देशपांडे, उमेश कुटे, भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे, नगरसेविका अनुराधा गोरखे, योगिता नागरगोजे उपस्थित होते.
सेवा हे यज्ञकुंड समिधा सम हम जले….या पद्याच्या ओळी सर्वार्थाने कार्यामध्ये उतरवणारे चिखली नगरातील एक समर्पित संघ स्वयंसेवक विजयरावजी पाठक यांचा 29 ऑगस्ट हा स्मृतिदिन.. बालांमध्ये रमणारे; समाजाभिमुख कामामध्ये अग्रेसर ; वैयक्तिक अडी अडचणींवर मात करत सातत्याने संघ कार्याचा वसा घेतलेले हे एक हसरे आणि सळसळत्या उत्साहाचे मूर्तिमंत प्रतीक.
त्यांना साजेसा स्मृतिदिन करावा असे स्वयंसेवकांनी ठरवले आणि त्यांच्या स्मृतीला वंदन करून रक्तदान उपक्रम; वृक्षारोपण असे समाजाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा; गट; नगर संघ कार्यकर्ते स्वयंसेवक; महिला आणि बाल यांच्या उपस्थितीने दिवंगत विजयराव पाठक यांच्या स्मृतीला आणि कार्याला उजाळा आणि नगरातील सेवा कार्यास एक नवी प्रेरणा मिळाली.