Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षकांची तत्काळ भरती करा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC)दळवीनगर आणि भोसरी अशा दोन ठिकाणी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागामार्फत इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. या दोन्ही शाळेत क्षमतेपेक्षा म्हणजे तब्बल 1200 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, विद्यार्थी संख्येनुसार ज्याठिकाणी 19 ते 20 शिक्षकांची गरज असताना फक्त चार शिक्षक कार्यरत आहेत. अपुर्‍या शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून या दोन्ही शाळांमध्ये तत्काळ मानधनावर शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष विशाल काळभोर यांनी केली आहे.

हेही वाचा  –  पवना, इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पाला तत्काळ निधी द्या

याबाबत शिक्षण विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार थोरात (PCMC)यांना निवेदन दिले आहे. अनेक गोर-गरिब पालक पाल्याचा महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. मात्र, महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या दळवीनगर आणि भोसरीत एक अशा दोनच प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. दुसरीकडे खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेची प्रवेश फी परवडत नसल्याने अनेक पालक महापालिकेच्या शाळेला प्राधान्य देत आहेत. असे असताना या दोन शाळेत क्षमतेपेक्षा म्हणजे तब्बल बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे अनेक गरजू विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत आहेत. तसेच इंग्रजी माध्यमांमध्ये 8 वी वर्गपर्यंत वर्ग आहेत, त्याठिकाणी 10 पर्यंत वर्ग सुरू करावेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना नंतर शाळा शोधावी लागणार नाही.

महापालिकेची काळभोरनगर येथे माध्यमिक विभागाची शाळा आहे. या शाळेत परिसरातील मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, या शाळेची इमारत जुनी झाली असून मोडकळीस आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधावी, अशी मागणीही काळभोर यांनी केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button