ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

हिंदू राष्ट्रासाठी सिद्धी विनायकाच्या चरणी

‘आय लव्ह मोहम्मद’ वर बागेश्वर बाबाची बेधडक प्रतिक्रिया

मुंबई : भारताला हिंदू राष्ट्र करण्याची प्रार्थना बागेश्वर बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मुंबईतील सिद्धी विनायक चरणी केली. त्यांनी मंदिरात पूजा अर्चना केली. यावेळी त्यांनी आय लव्ह मोहम्मदवर त्यांची प्रतिक्रिया दिली. आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव यावर काहीच आक्षेप नसल्याचे ते म्हणाले. पण सर तन से जुदा सारख्या मानसिकतेला थारा न देण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यांनी विविध विषयावर, मुद्दावर मतं मांडली.

हिंदू राष्ट्रासाठी पदयात्रा

धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, मी भारताला हिंदू राष्ट्र करण्यासाठी 7 ते 16 नोव्हेंबर या दरम्यान दिल्ली ते वृंदावन अशी पदयात्रा करणार आहे. देश हिंदू राष्ट्र व्हावे यासाठी आज सिद्धी विनायकाकडे प्रार्थना केली आहे. भगवान सर्व हिंदून यासाठी सद्बुद्धी देवो. त्यांच्या प्रयत्नातून हे हिंदू राष्ट्र होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये आपण लवकरच कथा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपण लवकरच तिथे जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. राज्य घटनेने भारतीयाला कुठेही जाण्याची परवानगी दिल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा :  “शरद पवारांचे मानस पुत्र विजय कोलते यांनी अहिल्यांच्या जागा लाटल्या”; प्रा. लक्ष्मण हाके 

आय लव्ह मोहम्मद वादावर टिप्पणी

आय लव्ह मोहम्मद वादावर पण धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मत व्यक्त केले. आय लव्ह मोहम्मद असो वा आय लव्ह महादेव, त्यामुळे काही अडचण नाही. पण सर तन से जुदा असं जर कोणी म्हणत असेल तर मग मोठी अडचण आहे. कारण त्याची परवानगी ना समाज देतो ना संविधान. छेडाल तर मग सोडणार नाही, असा इशारा ही त्यांनी दिला. भारतात लव्ह जिहाद बंद व्हावा अशी मागणी त्यांनी केली.

पाकिस्तानी नेत्याला भेटलो

यावेळी लंडन येथील कार्यक्रमात एका पाकिस्तानी नेत्याला भेटल्याची माहिती त्यांनी दिली. लंडनमधील कार्यक्रमात एक खान नावाची व्यक्ती आली होती. ते पाकिस्तानमध्ये मेयर पदावर होते. पण पुढे ते सनातनी झाले. त्यांनी गीता वाचली आहे. पण त्यांनी नाव बदलले नाही. आपण नावात बदल करावा का अशी विचारणा त्यांनी केली. पण इंजिन बदलल्यावर चेचिस नंबस तोच राहिला तरी फरक पडत नाही असे आपण त्यांना सांगितल्याची माहिती धीरेंद्र शास्त्री यांनी माध्यमांना दिली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button