विवाहितेवर बलात्कार : अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/rape-1.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
विवाहितेवर पाळत ठेऊन तिचा नंबर मिळवला. त्यानंतर तिच्याशी संपर्क वाढवून तिला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान तिचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले. ते व्हायरल करण्याची तसेच तिच्या पती आणि मुलाला जीवे मारण्याची आरोपीने धमकी दिली. ही घटना सन 2019 पासून पुढील सहा महिन्यांपर्यंत देहूरोड आणि तळेगाव दाभाडे परिसरात घडली.
मानतेश नाईकोडे (रा. गुलबर्गा, विजापूर, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या घरासमोर चालू असलेल्या बांधकामाच्या स्लॅबवरून फिर्यादीवर पाळत ठेवली. फिर्यादीचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांना वारंवार फोन करून जवळीक वाढवली. फिर्यादी महिलेला तिच्या राहत्या घरी आणि तळेगाव येथील सागर लॉजवर नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध केले.
दरम्यान आरोपीने फिर्यादी महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढले. फिर्यादीने आरोपीला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी नकार दिला असता तिच्या तोंडावर थुंकून, शिवीगाळ व मारहाण केली. फिर्यादी महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तिच्या पती आणि मुलाला जीवे मारण्याची आरोपीने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.