लग्नाचे आमिष दाखवून मैत्रिणीवर बलात्कार
![धक्कादायक! भर दिवसा १२ वर्षीय मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/rape-miner.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. ही घटना 9 ऑक्टोबर 2021 रोजी बंडगार्डन परिसरात घडली आहे. याबाबत 9 जानेवारी 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुचिर प्रमोद पेंढारकर (वय 29, रा. शेगाव, जि. बुलढाणा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची पूर्वीपासून ओळख आहे. त्या ओळखीतून आरोपीने फिर्यादी सोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. फिर्यादीला विश्वासात घेऊन आरोपीने त्यांना लग्नाचे आमिष दाखवले. त्यातून आरोपीने फिर्यादीच्या इच्छेविरोधात जबरदस्तीने वारंवार शरीर संभोग केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, आरोपीने तरुणीसोबत लग्नास नकार दिला. तरुणी सध्या पिंपरी चिंचवड परिसरात राहण्यास असल्याने तिने पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला. त्यावरून याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने हा गुन्हा बंडगार्डन पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.