इथे काम करायचे असेल तर मला दिवसाला दोन हजार द्यावे लागतील
![Mocca on five persons from Kamshet in Mavla, all remanded in police custody till December 8](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/karavai1_202104592576.jpg)
कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाला धमकावत मागितली खंडणी
पिंपरी l प्रतिनिधी
कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाला त्याच्या कामाच्या साईटवर जाऊन खंडणी मागितली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 5) दुपारी पिंपळे गुरव येथे घडली.
मोसिम बाबू सय्यद (वय 27, रा. दापोडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह डेव्हिड जगताप (वय 35, रा.सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम संजय चिपडेपाटील (वय 21, रा. पुणे, मूळ रा. यवतमाळ) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अंबिका कन्स्ट्रक्शन या कंपनीत काम करतात. त्यांच्या कंपनीने पिंपळे गुरव येथील त्रिमूर्ती चौकातील रस्त्याचे काम घेतले आहे. रविवारी दुपारी चार वाजता आरोपी मोसिम आणि डेव्हिड दुचाकीवरून तिथे आले. आरोपींनी फिर्यादी यांना त्यांच्या मालकाला फोन करण्यास सांगितले.
फिर्यादी यांनी मालकाला फोन केला. त्यावेळी आरोपींनी ‘या ठिकाणी काम करायचे असेल तर मला दिवसाला दोन हजार रुपये द्यावे लागतील. नाहीतर मी लोकांना बोलावून काम बंद पाडील’ अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्या मालकाला फोनवर धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी फिर्यादी यांना एटीएमकडे ओढले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.