राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचा सलग सहावा विजेतेपदाचा मान
शिक्षण विश्व: जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत भव्य विजय

पिंपरी-चिंचवड | मदनलाल धिंग्रा मैदान, निगडी येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालय, लांडेवाडी भोसरी येथील १९ वर्षाखालील मुलांच्या संघाने आपल्या दमदार कामगिरीच्या बळावर सलग सहाव्यांदा विजेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजमाता जिजाऊ ज्युनिअर कॉलेजच्या संघाने १० षटकांत ४ बाद १४३ धावा असा भक्कम डोंगर उभा केला. संघाकडून हर्षिल सावंत, सार्थक देसाई आणि वेदांत हंचे यांनी आक्रमक फलंदाजी करत विरोधी संघावर दडपण आणले. प्रत्युत्तरात सिम्बॉयसिस ज्युनिअर कॉलेजचा संघ केवळ १० षटकांत ७ बाद ६७ धावा इतक्याच करू शकला.
या रोमांचक सामन्यात आर्यन यादव, गुंजन सावंत, रणवीर राजपूत आणि सम्यक फिरोदिया यांनी अचूक व अडथळा आणणारी गोलंदाजी करत विरोधी फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिले नाही.
हेही वाचा : पिंपरी चिंचवडमध्ये आमदार लांडगे यांच्या वाढदिवसनिमित्त रक्तदान!
या विजयानंतर राजमाता जिजाऊ ज्युनिअर कॉलेजचा संघ आता १७ व १८ नोव्हेंबर २०२५ रोजी त्रिमूर्ती सैनिकी स्कूल, नेवासा फाटा (जि. अहिल्यानगर) येथे होणाऱ्या विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.
संघातील खेळाडू — गुंजन सावंत, आदित्य कापरे, ऋषिकेश शिंदे, रणवीर राजपूत, अभिनव केंगार, वेदांत हंचे, हार्दिक मोटे, संतोष चव्हाण, सार्थक देसाई, अभिनव जमदाडे, आर्यन यादव, सुधीश साठे, हर्षिल सावंत, अर्पण धर, सम्यक फिरोदिया, शंतनू फाटे — यांनी संघभावना, समन्वय आणि शिस्तीच्या बळावर हा विजय साकारला. या संघाला शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे व प्रशिक्षक श्री. दत्तात्रेय वाळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मा. आमदार विलास लांडे यांच्याकडून खेळाडुंचे कौतुक…
संस्थेचे अध्यक्ष व भोसरीचे प्रथम आमदार मा. विलासराव लांडे साहेब यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिं.चिं.मनपा स्थायी समितीचे मा. अध्यक्ष श्री. अजितभाऊ गव्हाणे, सचिव श्री. सुधीरभाऊ मुंगसे, नगरसेवक व संस्थेचे विश्वस्त विक्रमदादा लांडे, प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. नेहा बोरसे, रजिस्ट्रार सौ. अश्विनी चव्हाण, विभागप्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा. योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस तसेच प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संघाचे विशेष अभिनंदन केले. राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयाच्या या सलग सहाव्या विजयानंतर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वत्र खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




