ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवड

भोसरी येथे राजमाता जिजाऊ जयंती व प्रबोधन यात्रा उत्साहात

पिंपरी : राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ व प्रबोधन परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 12 जानेवारी 2023 रोजी शिवसृष्टी चौक लांडेवाडी, भोसरी येथे राजमाता जिजाऊ जयंती व प्रबोधन यात्रा समारोप समारंभ उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाला भोसरीचे प्रथम आमदार व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री .विलास लांडे, संस्थेचे सचिव मा. श्री. सुधीर मुंगसे, प्रसिद्ध व्याख्याते मा. श्री. गणेश शिंदे, युवा नेते मा. श्री. विराज लांडे, मा. श्री. अतिश बारणे, मा. श्री.प्रकाश मासुळकर, मा. श्री. संजय उदावंत, मा. श्री. सचिन आवटे, मा.श्री. उदय येळे, मा.श्री. दीपक साकोरे, मा. श्री. माणिकराव जैद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील, सर्व विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील यांनी, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सर्वांनी त्यांच्या विचारांचे आचरण करावे असे मत व्यक्त केले.

आपले मनोगत व्यक्त करताना भोसरीचे प्रथम आमदार मा. श्री. विलास लांडे यांनी, ज्या मातेने शिवबा घडविल्या त्या राजमाता जिजाऊंच्या नावाने शिक्षण संस्था निर्माण केली. राजमाता जिजाऊ या सर्वांच्या मार्गदर्शक होत्या. त्यांच्या शिकवणुकीवर शिवबांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, असे मत प्रतिपादन केले.
प्रसिद्ध व्याख्याते मा. श्री. गणेश शिंदे यांनी आपल्या “राजमाता जिजाऊ स्वराज्य संकल्पक” या विषयावर आपले विचार व्यक्त करताना, भोसले आणि जाधव घराण्याचा वारसा जिजाऊंनी पुढे चालवून बालशिवाजींवर उत्तम संस्कार केले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची शिकवण दिली. रयतेचे राज्य निर्माण करण्याचे मार्गदर्शन जिजाऊंनी केले. जिजाऊ स्वराज्य निर्मात्या होत्या, असे मत प्रतिपादन केले.

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ लांडेवाडी भोसरी पुणे 39 व प्रबोधन परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ जयंती सोहळा 1 जानेवारी 2023 सिंदखेडराजा पासून सुरू होऊन सिल्लोड, औरंगाबाद, अहमदनगर, जुन्नर, सातारा, कराड ,आष्टा, विटा, सांगली, टेंभुर्णी, मंगळवेढा, कल्याण ,मुरबाड, पुणे या मार्गाने प्रबोधन करीत राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून या यात्रेचा समारोप 12 जानेवारी 2023 रोजी शिवसृष्टी लांडेवाडी चौक ,भोसरी येथे करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नेहा बोरसे यांनी केले , तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी यांनी केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष व भोसरीचे प्रथम आमदार मा.श्री .विलास लांडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button