राजर्षी शाहू महाराज पुतळ्यामागे शाहू सृष्टी उभारणार
![Municipal Corporation will remove illegal billboards on electricity poles](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/08/pcmc-7.jpg)
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शाहूनगर – संभाजीनगर प्रभागातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यामागे शाहू सृष्टी उभारण्यात येत आहे. या शाहू सृष्टीची उर्वरीत कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी 5 कोटी 55 लाख रूपये खर्च होणार आहे.
शाहूनगर – संभाजीनगर प्रभागात महापालिकेतर्फे राजर्षी शाहू उद्यान विकसित करण्यात आले आहे. राजर्षी शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा असणा-या या उद्यानाचा पुनर्विकास करण्यात येत आहे. या उद्यानातील शाहू महाराज यांच्या पुतळ्यामागे शाहू सृष्टी उभारण्यात येत आहे. या शाहू सृष्टीची उर्वरीत कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. 7 कोटी 28 लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला.
तीन ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यापैकी देव कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराने निविदा दरापेक्षा 24.77 टक्के कमी दराने निविदा सादर केली. त्यानुसार, या कामासाठी रॉयल्टी चार्जेस 7 लाख 39 हजार आणि मटेरीयल टेस्टींग चार्जेसपोटी 65 हजार रूपये असे 5 कोटी 55 लाख रूपये खर्च होणार आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.