रहाटणी- पिंपळे सौदागर येथील योगा पार्कचे काम प्रगतीपथावर!
माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांची पाहणी : आशियातील सर्वात मोठी ‘क्लायबिगं वॅाल’
पिंपरी : प्रभाग क्र.२८ रहाटणी-पिंपळे सौदागर येथील योगा पार्कचे काम अंतिम टप्प्यात लवकरच लोकार्पण करण्यात येईल, अशी माहिती माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी यांनी दिली.
पिंपळे सौदागर येथे बनविण्यात येणाऱ्या योगा पार्कच्या विकास कामाची पाहणी मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मनपाचे अति. आयुक्त प्रदिप जांभळे पाटील व अधिकरी यांच्या समवेत पाहणी केली.
हेही वाचा – महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी?
नागरिकांसाठी विविध सोयीसुविधायुक्त असे योगा पार्क साकारण्यात येत आहे, यामध्ये १८ मीटर उंचीची बोल्डरिगं वॅाल, २१ मीटर स्पीड वॅाल, २१ मीटर लीड वॅाल, लहान मुलासाठी विविध खेळणी प्रकार, जेष्ठासाठी बैठक व्यवस्था, स्वतंत्र योगा व्यायामासाठी व्यवस्था, वॅाकीग ट्रॅक, प्रशस्त गार्डन व्यवस्था बनविण्यात आली आहे, या योगा पार्कमध्ये बनविण्यात आलेली क्लायबिगं वॅाल ही अशियामधील सर्वात मोठी वॅाल आहे, या वॅाल मध्ये सराव करणारे मुले ही नॅशनल लेवल स्तरावर खेळतील, अशी अपेक्षा नाना काटे यांनी यावेळी व्यक्त केली.
या पाहणीवेळी शहर अभियंता मकरंद निकम, स्मार्ट सिटीचे सहशहर अभियंता मनोज सेठीया, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता माणिक चव्हाण, उद्यान विभागाचे उपअभियंता गोसावी, शिर्के कंपनीचे लावंड, स्वामी, जाधव, शिखर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस श्रीकृष्ण कडुसकर, व इतर सहकारी उपस्थित होते.