महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी?

मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी पाच डिसेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून त्यानंतर आता फडणवीस सरकारच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. आजपासून ९ डिसेंबरपर्यंत विधिमंडळाचं अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या विशेष अधिवेशन काळात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी करण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत दिले होते. मंत्रिमंडळाचा विस्तार हा ११ किंवा १२ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – ‘सर्व शेतमालाची खरेदी हमीभावाने’; केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू होणार असून त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. विधानसभा सदस्यांच्या शपथविधीचे अधिवेशन ७ ते ९ डिसेंबर दरम्यान मुंबईत होणार असून राज्यपालांचे अभिभाषण व विधानसभा अध्यक्षांची निवड ९ डिसेंबरला होणार आहे.
दरम्यान, सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. विरोधक नसले तरी आम्ही त्यांचा आदर करतो. मतदार यांच्यामुळे तेवढे आमदार आले. तो जनतेचा कौल आहे. विधानसभेचे अध्यक्ष निर्णय आहे. विचार करु म्हणाले पण आज ते आले नाही. शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य आहे, असं उदय सामंत म्हणाले.





