पुष्पा चित्रपट दाखवण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/baby.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
आई बांधकाम साईटवर कामासाठी आली असता तिच्यासोबत आलेल्या अल्पवयीन मुलाला एकाने पुष्पा चित्रपट दाखवण्याचे आमिष दाखवले. चित्रपट पाहायला म्हणून बाजूला नेऊन आरोपीने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना मंगळवारी (दि. 17) दुपारी 12 ते एक वाजताच्या कालावधीत ट्रांझा पी जी च्या समोरील कन्स्ट्रक्शन साईटवर हिंजवडी येथे घडली.
अजितकुमार राजू पासवान (वय 30, रा. जयरामनगर, हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ट्रांझा पी जी च्या समोरील कन्स्ट्रक्शन साईटवर कामासाठी गेली. त्यावेळी फिर्यादीचा अल्पवयीन मुलगा त्यांच्यासोबत होता. आरोपीने फिर्यादीच्या मुलाला पुष्पा हा चित्रपट दाखवतो असे आमिष दाखवले. बिल्डिंगमध्ये नेऊन मुलाला चिल्लर पैसे दिले आणि मुलावर लैंगिक अत्याचार केले. मुलाने हा प्रकार फिर्यादी आईला सांगितल्यानंतर फिर्यादी यांनी याबाबत तात्काळ फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.