पिंपरी / चिंचवड

वाकडमध्ये पर्स तर चाकणमध्ये सोन्याचे दागिने हिसकावले

पिंपरी | प्रतिनिधी

रस्त्याने चालत जात असलेल्या महिलेच्या हातातील पर्स चोरण्याची घटना वाकडमध्ये घडली. तर गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्याची घटना चाकण येथे घडली. दोन्ही घटनांमध्ये पाऊण लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबत मंगळवारी (दि. 8) अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फुलाबाई नथु जाधव (वय 55, रा. तळेगाव चौक, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शनिवारी (दि. 5) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास चाकण-तळेगाव चौकात बहिणीला सोडण्यासाठी गेल्या. त्यावेळी तिथे आलेल्या एका अनोळखी महिलेने फिर्यादीच्या गळ्यातील 65 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली.

अतुल भीमाशंकर महिंद्रकर (वय 54, रा. आंबेगाव बुद्रुक, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय रविवारी (दि. 6) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास डांगे चौक वाकड येथून पायी चालत जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी फिर्यादी यांच्या पत्नीच्या हातातील पर्स जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेली. त्यामध्ये आठ हजारांचा एक मोबाईल फोन, तीन हजारांचे एक घड्याळ असा 11 हजारांचा ऐवज होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button