ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर कोट्यावधींचे रक्तचंदन पकडले
आंतरराज्यीय तस्करांचे जाळे उघडकीस

पिंपरी : पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अवैध मालमत्ता विरोधी पथकाने मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचे रक्तचंदन जप्त केले असून, एका मोठ्या तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात पोलिसांनी एका कंटेनरमध्ये लपवून नेले जात असलेले सुमारे १५ टन वजनाचे चंदन पकडले आहे. या कारवाईमुळे आंतरराज्यीय तस्करांचे जाळे उघडकीस आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरूहून पुणे मार्गे मुंबईच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर चंदनाची तस्करी होत असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अवैध मालमत्ता विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार सापळाचा रचत ही कारवाई करण्यात आली आहे.