Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुणे-लोणावळा लोकल सेवेला ४७ वर्ष पूर्ण

पिंपरी :  पुणे-लोणावळा उपनगरीय (लोकल) सेवेचा (दि.११) ४७ वर्ष पूर्ण झाले आहेत. दरम्यानच्या काळात लोकल सेवेने विविध टप्यांतून मार्गक्रमण केले असून आज लोकल सेवेमुळे लाखो प्रवाशांचा प्रवास सुखकर झाला.

पुणे ते लोणावळा ६०.५९ किलोमीटर अंतराची उपनगरीय (लोकल) सेवा ११ मार्च १९७८ रोजी सुरू झाली. एक रेक (लोकल) आणि दोन फे-यांपासून सुरु झालेला प्रवास आज चार रेक आणि ४० फे-यांपर्यंत येऊन ठेपला आहे. लोकल सेवा सुरु झाल्यामुळे पिंपरी चिंचवड शहराची उपनगरे आणि ग्रामीण भाग पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांशी जोडला गेला. लोणावळा-पुणे दरम्यान कामानिमित्त दररोज हजारो चाकरमानी, शाळा आणि कॉलेजला शेकडो विद्यार्थी ये-जा करत आहेत. तसेच ग्रामीण भागातून शहरात दूध आणि भाजी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी येत आहेत. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात जलद प्रवास करता येत असल्याने चाकरमानी, विद्यार्थी आणि शेतकरी आजही लोकलने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत.

सुरुवातीला पुणे विभागाला नऊ डब्यांचे डायरेक्ट करंटवर (डीसी) धावणारे जेसप कंपनीचे रेक उपलब्ध झाले होते. २००८-०९ च्या सुमारास नऊवरुन बारा डब्यांची लोकल धावू लागली. डीसी करंटवर धावणारी लोकल २०१२ च्या सुमारास अल्टरनेट करंटवर(एसी) धावु लागली. त्यामुळे प्रवासाचा वेग वाढला. लोकलच्या फे-याही ३८ वरुन ४४ झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. १९७८ नंतर कधीही न थांबणारी लोकलची चाके २०२० मध्ये कोरोनामुळे थांबली. सुमारे दोन वर्षांनी लोकल सेवा सुरु झाली मात्र लोकलच्या फे-या कमी होऊन ४४ वरुन ४० झाल्या. शिवाजीनगरला लोकलसाठी विशेष प्लॅटफार्म तयार करुन येथून तळेगाव आणि लोणावळासाठी चौदा लोकल फे-या धावत आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये स्वयंचलित सिंग्नल यंत्रणेचे काम पूर्ण झाले. त्यामुळे रेल्वे गाड्या अचूक वेळेत धावून प्रवासाच्या वेळेत बचत झाली. लोकल सेवेला मंगळवारी (ता. ११) ४७ वर्ष पूर्ण झाले असले तरी अजूनही मुंबई प्रमाणे पुणे-लोणावळा दरम्यान लोकलसाठी वेगळी लाईन, जलद लोकलसह विविध मागण्या प्रलंबित आहेत. भविष्यात मागण्या पूर्ण कधी होणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा –  ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ मध्ये शहराला अव्वल आणण्यासाठी अभिप्राय नोंदवा; महापालिकेचे आवाहन

पुणे- लोणावळा माहिती दृष्टीक्षेपात..

लोकल फे-या – ४०

प्रवाशी संख्या – ७० हजार

एकूण स्थानके – १७

एकूण अंतर – ६०.५९

या आहेत मागण्या..

– तिस-या आणि चौथ्या मार्गिका.

– पीक अवर फास्ट लोकल सुरु करा.

– मेधा किंवा बमबार्डियार (अलस्ट्रॉम) रेक द्या.

– लोकल फे-या वाढवा.

– दुपारी लोकल सुरु करा.

– मुंबई प्रमाने पुणे लोणावळा दरम्यानचा १५डब्याच्या लोकल सूरू कराव्यात.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

पुणे लोणावाळा स्वयंचलित सिग्नल यंत्रणा पुर्ण झाल्याने दोन गाड्यांमधील अंतर कमी झाले आहे. याचा फायदा लोकलच्या प्रवाशांना भेटावा आणि गर्दीच्या वेळेत लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या. तसेच मार्गावरील ताण कमी करण्यासाठी रेल्वेने लवकरात लवकर पुणे लोणावळा तिसऱ्या व चौथ्या लाईनचे काम सुरु करणे आवश्यक आहे.

ईक्बाल मुलाणी, माजी अध्यक्ष, पिंपरी चिंचवड रेल्वे प्रवाशी संघटना.

मी गेली २० वर्षे नियमित लोकलने तळेगाव पुणे प्रवास करत आहे. गेल्या २० वर्षात प्रवासी संख्या खुपच वाढली पण अपक्षेप्रमाणे लोकलच्या फेऱ्या अजुनही वाढवण्यात आलेल्या नाही. लोकलचे नवीन रेक देऊन फेऱ्यांमध्ये वाढ केली पाहिजे.

मयुरेश जव्हेरी, प्रवासी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button