Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय, चार तरुणींची सुटका

पिंपरी | निगडी येथील ‘फोनिक्स’ स्पा सेंटरमध्ये ‘स्पा’च्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू होता. यावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारून कारवाई करत चार महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई शनिवारी (१६ मार्च) रात्री सव्वा आठच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी येथे इन्स्पिरिया मॉलमध्ये फोनिक्स नावाने सुरू असलेल्या स्पामध्ये वेश्याव्यवसाय केला जात असल्याची माहिती अनैतिक वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता.

हेही वाचा      –      ‘नवे मित्र मिळताच, जुन्यांना विसरु नये’; रामदास आठवलेंचं विधान 

पोलिसांनी ‘फोनिक्स स्पा’मध्ये डमी ग्राहक पाठवला, तिथे वेश्याव्यवसाय केला जातो का? याची शहानिशा केली. मग ‘स्पा’वर छापा टाकण्यात आला. या प्रकरणी चार तरुणींची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. महिला मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून फरार आरोपी दिनेश गुप्ताचा पोलीस शोध घेत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button