Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर!

PCMC : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचा निर्णय

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून शहरात मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू आहे. चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता केवळ दोन महिने शिल्लक राहिले आहेत. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना कर भरण्यास अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील १८ विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांसाठी कर भरण्यासाठी १८ विभागीय कर संकलन कार्यालये कार्यान्वित असून, या ठिकाणी तसेच ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर संकलन विभागाच्या वतीने थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू असून, थकबाकीदारांवर मालमत्तांची जप्ती करणे तसेच नळ कनेक्शन खंडित करण्याच्या कारवाया केल्या जात आहेत. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी आपला थकीत मालमत्ता कर वेळेत भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा     :          “परज्या” चित्रपटास सुवर्ण कैलास पारितोषिक !  

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व संकलन विभागाच्या वतीने विविध माध्यमांतून नागरिकांना मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांसाठी ऑनलाईन कर भरणा करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील करदात्यांनी मालमत्ता कराचा भरणा करून शहराच्या विकासामध्ये हातभार लावावा.

– तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तसेच शनिवार आणि रविवार या कालावधीत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत सर्व १८ विभागीय कर संकलन कार्यालयांतील कॅश काऊंटर सुरू असणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी कर भरण्याची वेळ वाढविण्यात आली असून, दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.

– सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button