पंतप्रधान नरेंद्र मोदी चाफेकर बंधू स्मारकाला भेट देणार; चिंचवडमध्ये बैठक संपन्न

चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी (दि.१८) चिंचवड येथे चापेकर बंधू स्मारकाला भेट देणार आहेत. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गुरुवारी (दि.१०) चापेकर वाड्यात तयारी बैठक घेण्यात आली.
या बैठकीत विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, पद्मश्री गिरीश प्रभूणे, मिलिंद देशपांडे, मुकुंदराव कुलकर्णी, शत्रुघ्न काटे, रविंद्र नामदे तसेच चापेकर समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा – ‘मित्र पक्षाकडून सत्तेचा वाटा योग्य प्रमाणात मिळत नाही’; रामदास आठवले यांनी व्यक्त केली खंत
या बैठकीत कार्यक्रमाचे सर्व पैलूंवर सविस्तर चर्चा झाली असून, नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा कार्यक्रम संस्मरणीय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.