breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपाकडून धार्मिक द्वेशाचे राजकारण : माजी आमदार जयदेव गायकवाड

  • राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचा पदवाटप समारंभ

पिंपरी । प्रतिनिधी

केंद्रातील सत्ताधारी भाजपा धार्मिक द्वेषाच्या राजकारण करीत असून, माणसाच्या मनामध्ये धर्म बिंबवून सत्ता काबीज करणे आणि जातीय धर्मांना बदनाम करून सत्तेची पोळी भाजून घेणे हे भाजपाचे कटकारस्थान आहे. भांडवलशाहीच्या हातात या देशाची सत्ता जावी म्हणून अदानी अंबानीसाठी प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध केला पाहिजे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पदवाटप समारंभाचे आयोजन ताथवडे येथील हॉटेल ब्लू वॉटरमध्ये करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपाध्यक्ष पंडितराव कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष श्री संजोगभाऊ भाऊ वाघेरे पाटील, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विद्यमान नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्ष प्रवक्ते फजलभाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस अरुण काळे, उद्योजक संदीपभाऊ पवार, उद्योजक स्वप्नील भांडवलकर, शैलेश जाधव, युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संदीप उर्फ लाला चिंचवडे, लिगल सेल अध्यक्ष-अॅड गोरक्ष लोखंडे,शहर उपाध्यक्ष मा, संदिपानजी झोंबाडे, गोरक्षनाथ पाषाणकर, भोसरी विधानसभा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा मनिषाताई गटकळ,राष्ट्रवादी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शक्रूलाभाई पठाण, पिंपरी ब्लॉक राष्ट्रवादी अध्यक्ष संजय औसरमल, मोरवाडी ब्लॉक राष्ट्रवादी अध्यक्ष रशीद सय्यद, राष्ट्रवादी पदवीधर संघाचे अध्यक्ष माधव पाटील, अशोक मगर, राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष अकबर मुल्ला, राष्ट्रवादी सेवादलाचे अध्यक्ष महेश झपके, गोरक्षनाथ पाषाणकर, सुलेमान मामू शेख,इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते,

कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे, कार्याध्यक्ष बाळासाहेब पिल्लेवार, मुख्य सरचिटणीस अभिजीत आल्हाट, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष आकाश मोहिते,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष योगेश आयवळे, सूर्यकांत पात्रे, विठ्ठल उर्फ नाना धेंडे, अभिजीत भालेराव, सचिन सकाटे यांनी केले.

पद वाटपामध्ये पिंपरी विधानसभा अध्यक्ष म्हणून भूषण डुलगुच, पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष म्हणून लूकस मुगुटमल , यांची तर चिंचवड विधानसभा अध्यक्ष म्हणून सागर ओव्हाळ, यांची नियुक्ती करण्यात आली, प्रविण बनसोडे, वरिष्ठउपाध्यक्ष म्हणून चंद्रकांत बोचकुरे, उपाध्यक्ष म्हणून बलजितसिंग आदीयाल, सुनील कुसाळकर ,भगवान खुडे, सुजित कांबळे, सौरव भंडारे, साहेबराव तुपे, रमेश तुपे, पिंपरी-चिंचवड शहरातील एकुण 22 प्रभागाच्या अध्यक्ष म्हणून नवीन प्रभाग अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या पद वाटप आढावा बैठकीस मोठ्या संख्येने नेतेमंडळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button