TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स मेट्रो रेल्वे मार्ग ‘रुळावर’
बारा किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम पूर्ण
पिंपरी | मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या बारा किलोमीटर लांबीचा मार्ग पूर्ण झाला आहे. या उन्नत मार्गिकेसाठीचे दोन खांब एकमेकांना जोडण्याची प्रक्रिया (सेगमेंट) पूर्ण झाली असून येत्या काही दिवसांत मार्गिकेवर मेट्रोची चाचणी घेऊन फुगेवाडी ते शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय या दरम्यानची प्रवासी सेवा लवकरच सुरू होणार आहे.दरम्यान, फुगेवाडी ते शिवाजीनगर सत्र न्यायालय या मार्गातील कामे तीन नोव्हेंबरपर्यंत, तर गरवारे महाविद्यालय ते शिवाजीनगर सत्र न्यायालय या टप्प्यातील कामे ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होतील, असा दावा महामेट्रोकडून करण्यात आला आहे.





