टेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड अत्याधुनिक क्रीडा संकुल, CBSE शाळा उभारा : नगरसेविका कविता भोंगाळे

महापालिका सर्वसाधारण सभा : अर्थसंकल्पावर चर्चेत शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रासाठी मागणी

पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्प 2026-27 वर चर्चा करताना नगरसेविका कविता भोंगाळे यांनी शहरातील क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले.

अर्थसंकल्पावरील भाषणात त्यांनी स्पष्टपणे मांडले की, पिंपरी चिंचवड शहर झपाट्याने विकसित होत असताना आधुनिक क्रीडा सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्थांची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. यामुळे अनेक होतकरू खेळाडू आणि विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

यावेळी त्यांनी आमदार महेश लांडगे यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या पुढाकारातून शहरात विविध क्रीडा उपक्रम राबवले जात असून, युवकांमध्ये क्रीडाविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. कविता भोंगाळे यांनी अर्थसंकल्पात PPP (Public-Private Partnership) मॉडेलद्वारे अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि CBSE संलग्न शाळा उभारण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रकल्पामुळे महापालिकेवरील आर्थिक भार कमी होईल आणि नागरिकांना जलद गतीने दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील, असे त्यांनी नमूद केले.

प्रस्तावित क्रीडा संकुलात आधुनिक मैदाने, इनडोअर हॉल, जिम्नॅशियम, स्विमिंग पूल आणि प्रशिक्षित मार्गदर्शकांचा समावेश असावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच CBSE शाळेमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल व कौशल्याधारित शिक्षणाची संधी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

“शिक्षण आणि क्रीडा या दोन क्षेत्रांमध्ये भक्कम गुंतवणूक केल्याशिवाय शहराचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. त्यामुळे हा प्रकल्प तातडीने मंजूर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी,” असे आवाहनही त्यांनी सभागृहात केले. कविता भोंगाळे यांच्या या मांडणीमुळे अर्थसंकल्प चर्चेत क्रीडा व शिक्षण या विषयांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, शहराच्या भविष्यासाठी हा प्रस्ताव निर्णायक ठरू शकतो, अशी चर्चा रंगू लागली आहे.

“पिंपरी चिंचवडमधील प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण आणि प्रत्येक युवा खेळाडूला जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात, हीच आपली सामूहिक जबाबदारी आहे. योग्य नियोजन आणि ठाम इच्छाशक्तीच्या बळावर आपण हे स्वप्न नक्कीच साकार करू. येत्या काही वर्षांत आपल्या शहरातील खेळाडू राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकतील, याबाबत मला पूर्ण विश्वास आहे.
– कविता भोंगाळे, नगरसेविका, भाजपा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button