Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Pimpri-Chinchwad Police: पोलिस हो, वाढदिवसाला घ्या आता हक्काची सुट्टी!

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचा आदेश : वाढदिवसाच्या पूर्वसंधेला पोलीस ठाण्यात होणार 'सेलिब्रेशन'

पिंपरी- चिंचवड : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पोलीस बांधवांसाठी अतिशय कौतुकास्पद आणि स्तुत्य निर्णय घेतला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हक्काची सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे आदेश पोलीस ठाणे आणि पोलिसांच्या विविध शाखांना देण्यात आले आहेत. दरम्यान वाढदिवसाच्या पूर्व संधेला प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या पोलीस कर्मचारी बांधवांचा वाढदिवस साजरा करावा असे देखील आदेशात म्हटले आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी त्यांच्या वाढदिवसाकरिता सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिक तसेच राज्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांची ड्युटी ही अत्यावश्यक सेवेत मोडली जाते त्यामुळे त्यांच्या सुट्ट्यांबाबत नेहमीच तुटवडा असतो. वेळप्रसंगी पोलिसांना त वैयक्तिक कामे असतानाही ते रजेवर जाऊ शकत नाहीत. पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना दैनंदिन कामाच्या व्यापामुळे बरेचदा स्वतःचे वाढदिवस असतानाही कामाकरिता हजर होणे व आपल्या कुटुंबाला वेळ देणे शक्य होत नाही. तसेच दैनंदिन कामाच्या व्यापामुळे त्यांच्यात ताणतणाव निर्माण होऊन त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो. या सर्व बाबींचा विचार करून यापुढे त्यांना त्यांच्या वाढदिवस, करिता सुट्टी देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी घेतला आहे.

दरम्यान वाढदिवसाच्या आदल्या दिवशी पूर्वसंध्येला पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित वरिष्ठ अधिकारी हे पोलीस ठाण्यातील ज्यांचा वाढदिवस आहे. त्या अधिकारी व कर्मचारी यांचा वाढदिवस साजरा करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश हे संबंधितांना देतील, असेही पोलीस आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button