breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पिंपरी / महाईन्यूज

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाही राष्ट्र घडवण्यासाठी दिलेले योगदान अनन्य साधारण  असून येणा-या अनेक पिढ्यांसाठी बाबासाहेबांचे विचार प्रेरक ठरतील असे प्रतिपादन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी केले.तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी नागरिकांना शुभेच्छा देताना त्या बोलत होत्या. महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस, पिंपरी चौक येथील पुर्णाकृती पुतळयास, एच.ए कॉलनी,पिंपरी येथील अर्धाकृती पुतळ्यास तसेच दापोडी प्राथमिक शाळेजवळील अर्धाकृती पुतळ्यास आज महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महापालिका मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त राजेश पाटील, उपआयुक्त आशादेवी दुरगुडे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, कामगार नेते गणेश भोसले आदी उपस्थित होते.

पिंपरी चौक, येथे झालेल्या कार्यक्रमावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके ,विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, नगरसदस्या सुलक्षणा धर, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त राजेश पाटील,  उपआयुक्त आशादेवी दुरगुडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, कामगार नेते गणेश भोसले, जनसंपर्क विभागाचे देवेंद्र मोरे आदी उपस्थित होते.

एच.ए कॉलनी येथे झालेल्या कार्यक्रमावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे,  विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, माजी उपमहापौर महमदभाई पानसरे, नगरसदस्या सुजाता पालांडे, सुलक्षणा धर,  आयुक्त राजेश पाटील, उपआयुक्त आशादेवी दुरगुडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले , जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, कामगार नेते गणेश भोसले , जनसंपर्क विभागाचे  देवेंद्र मोरे आदी उपस्थित होते.

दापोडी येथे झालेल्या कार्यक्रमावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, विरोधी पक्षनेते शरद उर्फ राजू मिसाळ, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, सुलक्षणा धर , अंबरनाथ कांबळे, राजू बनसोडे , आयुक्त राजेश पाटील, उपआयुक्त आशादेवी दुरगुडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले , जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड, कामगार नेते गणेश भोसले, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे  आकाश चव्हाण आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button