Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये सायंकाळी गारांसह जोरदार पावसाचा तडाखा

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवडच्या सखल भागात आज सायंकाळी जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे चाकरमान्यांची प्रचंड धावपळ झाली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असल्यामुळे अभिवादन करण्यासाठी सायंकाळी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली.

कासारवाडी भागात गारांचा पाऊस झाला. रहाटणी, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव परिसरात पवसाचा जोर कायम होता. पिंपरी, भोसरी, निगडी, आकुर्डी, चिंचवड भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला. आज दुपारपासून ढगाळ वातावरण होते. यावरून पावसाचा अंदाज येत होता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button