ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी- चिंचवडकरांसाठी Good News : नाशिक फाटा- खेड एलिव्हेटेड कॉरिडोरला मंजुरी!

"बिग बझेट" प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेट मंत्री मंडळाची मंजुरी

– तब्बल 7 हजार 827 कोटी रुपयांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प

– नाशिक फाटा ते खेड अंतर अवघ्या काही मिनिटात होणार पार

– तळवडे-चिखली-मोशी- भोसरी परिसरातील “ट्रॅफिक कोंडी” कायमची सुटणार!

पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने बहुप्रतिक्षित “8 लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा- खेड कॉरिडोर”ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

तब्बल 7 हजार 827 कोटी रुपये किमतीच्या 32 किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे, पिंपरी-चिंचवडसह चाकण औद्योगिक पट्ट्यातील प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडणारा दुवा निर्माण होणार आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार महेश लांडगे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आहे. पिंपरी-चिंचवडच्या शाश्वत विकासाला नवा आयाम यानिमित्ताने मिळणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिक फाटा ते खेड अंतर अगदी काही मिनिटात पार करता येईल. तसेच, शहरातील तळवडे-चिखली-मोशी- भोसरी परिसरातील “ट्रॅफिक कोंडी” कायमची सुटणार आहे.

पिंपरी- चिंचवड शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तमाम पिंपरी चिंचवडकर यांच्या वतीने आमदार महेश लांडगे यांनी आभार मानले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button