TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड गणेशोत्सव : राष्ट्रवादीचे युवानेते पार्थ पवार यांची शहरात हजेरी

पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील गणेशोत्सवा निमित्त काल गुरुवारी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मनसे युवानेते अमित ठाकरे यांनी शहरातील विविध गणपती बाप्पाच्या आरतीसाठी हजेरी लावली.
त्यानंतर गणेश विसर्जनापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवानेते पार्थ पवार आणि पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहर परिसरातील विविध गणेश मंडळाच्या श्रीगणेश आरती करिता हजेरी लावली.


याप्रसंगी माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.
करोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त झाल्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला असून, आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी गर्दी केली आहे. राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह असून गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये फक्त सर्वसामान्यच नाही, तर राजकीय नेतेही सहभागी होत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button