पिंपरी-चिंचवड शहरात चोरट्यांचा धुमाकूळ…
![Pimpri-Chinchwad city is full of thieves ...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/630570-robbers-01.jpg)
पिंपरी |
जबरीचोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोनसाखळी, रोख रक्कम तसेच मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून चोरटे चोरून घेऊन जात आहेत. शहरात विविध पोलीस ठाण्यात शुक्रवारी जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल झाले होते. त्यापाठोपाठ सलग दुसऱ्या दिवशी शनिवारीही (दि. १३) जबरी चोरीचे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत.
पहिल्या प्रकरणात तिजा पुपराज चौधरी ( वय ६०, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी शनिवारी (दि. १३) रात्री आठच्या सुमारास चिंचवडगाव येथे तानाजीनगर येथील शिवाजी उदय मंडळ येथून रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने फिर्यादीची २० ग्रॅमची ५० हजारांची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. दुसऱ्या प्रकरणात विक्रमसिंग गणपतसिंग राठोड (वय १८, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे १९ ऑक्टोबर २०२० रोजी चिंचवड येथे बर्ड व्हॅली उद्यान ते थरमॅक्स चौक दरम्यान रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी दोन चोरट्यांनी मोबाईल हिसकावून नेला आहे.