PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिका महिला बचत गटांना ३७ गाळे मोफत देणार!
विधायक उपक्रम: नोंदणीकृत व पाच वर्षे पूर्ण झालेल्या महिला बचत गटांकडून अर्ज मागविले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/Pune-41-780x470.jpg)
पिंपरी- चिंचवड : नोंदणीकृत महिला बचत गटांना अनुदान तसेच विविध माध्यमातून बळ दिले जात असताना महापालिकेच्या समाजविकास विभागाच्या महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत शहराच्या विविध भागांमधील एकूण ३७ गाळे महिला बचत गटांना मोफत उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्याकरिता नोंदणीकृत व पाच वर्षे पूर्ण झालेल्या महिला बचत गटांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
महापालिकेने विविध भागांमध्ये व्यापारी गाळे बांधलेले आहेत. हे गाळे भाडेतत्वावर उपलब्ध करू देण्याची प्रक्रिया पालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाच्या वतीने केली जाते. तत्पूर्वी महापालिकेच्या नगररचना विभागाकडून त्या भागातील भाडेदराची पडताळणी केली जाते. या विभागाने ठरवून दिलेल्या दरानुसार निविदा प्रसिद्ध करून या गाळ्यांचे वितरण केले जाते. मात्र नागरवस्ती विभागाने महिला सक्षमीकरणासाठीआकुर्डीतील गंगानगरमधील कै. पांपडुरंग काळभोर सभागृह येथील व्यापारी संकुलातील एकूण १४ गाळे तर भोसरी भाजी मंडईतील व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावरील एकूण २३ गाळे या उपक्रमासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती.
हेही वाचा – शिक्षण विश्व: नवनिर्माण बंजारा क्रांती सेनेकडून अंकिता गावडे हिचा सत्कार!
दरम्यान, या मागणीची दखल घेत, भूमी व जिंदगी विभागाने आपल्या अधिकारातील या दोन्ही ठिकाणचे व्यापारी गाळे. नागरवस्ती विभागाकडे हस्तांतरित केले आहेत. त्यानुसार आता या गाळ्याचे क्षेत्रफळ जाहीर करत, महापालिकेच्या समाजविकास विभागाने हे गाळे शहरातील महिला बचत गटांना मोफत उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार पात्र महिला बचत गटांकडून या गाळ्यांकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
नागरवस्ती विभागाने केलेल्या मागणीनुसार शहराच्या दोन ठिकाणच्या व्यापारी संकुलातील एकूण ३७ गाळे या विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही या विभागामार्फत होणार आहे.
– मंगेश कोळप, सहाय्यक आयुक्त, भूमी व जिंदगी विभाग