PCMC: चिखली कुदळवाडीतील व्यापारी रस्त्यावर; तीन तास रस्त्यावर ठिय्या!
रास्ता रोको, वाहतूक कोंडी अन् तणावाचे वातावरण : प्रशासन कारवाईवर ठाम; नागरिकांच्या भावनांचा आदर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Dr.-Neelam-Gorhe-1-3-780x470.jpg)
पिंपरी- चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिखली-कुदळवाडीतील अनधिकृत भंगार दुकानांवर गुरुवारी (दि.३०) कारवाईला सुरवात केली. मात्र, या कारवाईला स्थानिक व्यापाऱ्यांनी विरोध करत देहू-आळंदी रस्ता अडवल्याने रस्त्यांवर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या. सुमारे तीन तास नागरिकांनी रस्त्यावर ठाण मांडले. या भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पिंपरी पालिका , पोलीस प्रशासन,राज्य राखीव बलाचे पोलीस, पालिकेचे सुरक्षारक्षक या ठिकाणी तैनात होते.
पिंपरी चिंचवड येथील चिखली, कुदळवाडीतील भंगार दुकाने, गोदामे, कंपन्या, हॉटेल, वर्कशॉप्स, बेकरी अशी अनधिकृत बांधकामे आणि पत्राशेड उभारलेल्या 4 हजार 300 दुकाने, पत्रा शेड, टपऱ्या यांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. आजपासून महापालिकेने कारवाईला सुरुवात केली होती सकाळपासूनच याबाबतची तयारी सुरू होती महापालिकेचे अतिक्रमण पथक या भागात दाखल झाल्याची कोण कोण नागरिकांना लागतात नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन छेडले आहे. त्यामुळं मोठी वाहतुक कोंडी निर्माण झाली. बंदोबस्तासाठी पोलिस परिसरात दाखल झाले. महापालिकेने पाठवलेल्या नोटीसनंतर पिंपरी-चिंचवड लघु उद्योजक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह पवारवस्ती, चिखली येथे बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान उद्योजकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
हेही वाचा : सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर २१ फेब्रुवारीपासून ‘पवनाथडी’ जत्रा
मोठी गोदामे, वारंवार उद्भवणाऱ्या आगीच्या घटना यामुळे चिखली, कुदळवाडी परिसर संवेदनशील झाला आहे. या भागातील अनधिकृत बांधकामे दुकाने कळीचा मुद्दा ठरत आहे.चिखली, कुदळवाडी, पवारवस्ती, जाधववाडी या औद्योगिक परिसरात सुमारे पाच ते सात हजार लघुउद्योजक आहेत. या ठिकाणी हजारो कामगार काम करतात. मात्र निमुळते रस्ते, अरुंद झालेल्या वाटा, दाटीवाटीने उभारण्यात आलेले अनधिकृत पत्र शेड आणि वारंवार भंगार व्यवसायिकांच्या दुकानांना लागणाऱ्या आगीच्या घटना यामुळे येथील अनधिकृत पत्राशेड रडारवर आले. नागरिकांकडून या घटना संदर्भात तक्रारींचा पाढा वाचला जाऊ लागला. आगीच्या घटनांमुळे प्रदूषणाचे प्रमाण देखील वाढत आहे हाच मुद्दा घेत पिंपरी पालिकेने या ठिकाणी कारवाईला सुरुवात केली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
कारवाई थांबणार नाही : महापालिका प्रशासन
पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिक्रमण विभाग उपायुक्त मनोज लोणकर म्हणाले की, कुदळवाडी – चिखली परिसरामध्ये अनधिकृतपणे पत्राशेड उभारून व्यवसाय करत असणाऱ्या व्यापाऱ्यांना महापालिकेच्या वतीने नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. कुदळवाडी चिखली परिसरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कायदेशीरित्या या व्यापाऱ्यांना अनधिकृत बांधकामा संदर्भात नोटीसा दिलेल्या आहेत. पंधरा दिवसांची त्यांना मुदतही देण्यात आलेली होती. या मुदतीत त्यांनी अनधिकृत बांधकाम काढावे अशी सूचना करण्यात आलेली आहे. महापालिकेने या भागातील 4 हजार 300 व्यापाऱ्यांना अनधिकृत बांधकामा संदर्भात नोटीसा देऊन पंधरा दिवसात अनधिकृत बांधकाम हटवण्यात संदर्भात कळविण्यात आले होते. मात्र ही बांधकामे हटवण्यात आलेली नाही. नागरिकांचा उद्रेक लक्षात घेऊन तूर्तास कारवाई स्थगित ठेवण्यात आली . व्यापारी आणि पालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक होऊन या संदर्भात पुढील निर्णय घेतला जाईल.