पीसीसीओईआरची मनस्वी रणखांबची यशस्वी भरारी
शिक्षण विश्व : पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

पिंपरी | पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील स्थापत्य विभागाची विद्यार्थिनी मनस्वी रणखांब हिची ‘हेमचंद्राचार्य उत्तर गुजरात विद्यापीठ, पाटण’ येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यापूर्वी नांदेड येथे झालेल्या ‘अश्वमेध’ या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्हॉलीबॉल मुलींच्या संघामध्ये मनस्वी रणखांब हिने विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या संघाला रौप्य पदक मिळाले होते. पीसीसीओईआरचे क्रीडा संचालक मिलिंद थोरात यांनी मार्गदर्शन केले.
हेही वाचा : भारत–दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना कधी अन् कुठे पाहता येणार?
पीसीसीओईआरचे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी मनस्वीचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.



