भारत–दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना कधी अन् कुठे पाहता येणार?

IND vs SA | भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेली ५ टी-२० सामन्यांची मालिका सध्या चांगलीच रंगतदार वळणावर पोहोचली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघ याने एकतर्फी विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने दमदार पुनरागमन करत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली आहे. त्यामुळे तिसरा सामना दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी -२० सामना १४ डिसेंबरला हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर थेट पाहता येणार असून, सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओ हॉटस्टारवर उपलब्ध असणार आहे.
हेही वाचा : प्रबोधन, प्रशिक्षण व संशोधन ही लोकशाही समृद्धीची त्रिसूत्री; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
भारतीय संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर.





