पवना धरण ५० टक्के भरले! पिंपरी-चिंचवड शहरवासियांना दिलासा

पवनानगर | प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील शेतकरी, नागरिक यांसह पिंपरी-चिंचवड शहर वासियांसाठी पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. मावळासह पिंपरी-चिंचवड महानगराची तहान भागविणारे पवना धरण ५० टक्के भरले आहे.
मावळ तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मावळ तालुक्यातील डोंगरदऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला असून पवना नदीसह इंद्रायणी दुथडी भरून वाहत आहे. याचीच परिनिती म्हणजे(दि.२४) मंगळवारी दुपारी १२ वाजता पवना धरणाने पन्नाशी ओलांडली असून पवना धरणात ५०.७८ टक्के पाणीसाठा जमा झाला.
हेही वाचा : मराठीवर हल्ले होत असताना नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, प्रशांत दामले गप्प का? संजय राऊतांचा सवाल
पवना धरण क्षेत्रात सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरण आज ५१ टक्क्यांच्या जवळपास पोहोचले. गेले आठवडाभरपासून पवना धरणाच्या बॅक वॉटर भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली असून ओढे, प्रवाह दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे धरणामध्ये पाणीसाठा जलद गतीने वाढत आहे.





