Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या पाणीटंचाईवर आमदार अमित गोरखे आक्रमक!

शहराला ३० एम.एल.टी. वाढीव पाण्याची आणि जॅकवेल प्रकल्पाची सभागृहात मागणी

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि त्या तुलनेत अपुरा पडणारा पाणीपुरवठा या गंभीर विषयावर आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत आवाज उठवला आहे. शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी अतिरिक्त ३० एम.एल.टी. पाणीसाठा मंजूर करावा आणि आंध्र धरण प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करावे, अशी आग्रही मागणी त्यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’च्या माध्यमातून सभागृहात केली.

यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड हे राज्याचे महत्त्वाचे औद्योगिक आणि निवासी केंद्र आहे. मात्र, सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरा पडत आहे. यामुळे नागरिकांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी मिळण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

हेही वाचा –  ‘राज्यात गुन्हेगारीत घट; न्याय व्यवस्थेत महाराष्ट्र आघाडीवर’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आमदार अमित गोरखे यांच्या प्रमुख मागण्या

-३० एम.एल.टी. अतिरिक्त पाणीसाठा: पुणे महानगरपालिकेकडे सध्या वर्ग होत असलेला ३० एम.एल.टी. पाणीसाठा पिंपरी-चिंचवड शहरासाठी मंजूर करण्यात यावा, जेणेकरून नागरिकांची तात्पुरती गरज भागेल.

-जॅकवेल प्रकल्पासाठी जागा: आंध्र धरण परिसरात सिंचन विभागाची सुमारे अडीच एकर जागा उपलब्ध झाल्यास, त्या ठिकाणी जॅकवेल प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करता येईल.

-दीर्घकालीन उपाययोजना: जॅकवेल प्रकल्प पूर्ण झाल्यास शहरासाठी दीर्घकालीन आणि मुबलक पाणीसाठा उपलब्ध होऊ शकेल, ज्यामुळे भविष्यातील पाण्याची चिंता मिटेल.

-आमदार गोरखे यांनी या विषयाचे गांभीर्य सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. संबंधित विभागाने यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती केली आहे. शहराच्या मूलभूत गरजांसाठी आपण सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही आमदार अमित गोरखे यांनी यावेळी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button