Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर २१ फेब्रुवारीपासून ‘पवनाथडी’ जत्रा
![‘Pavanathadi’ fair to be held from February 21 at PWD ground in Sangvi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/‘Pavanathadi-fair-to-be-held-from-February-21-at-PWD-ground-in-Sangvi-780x470.jpg)
पिंपरी | पिंपरी चिंचवड शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, म्हणून महापालिकेच्या वतीने २१ ते २४ फेब्रुवारी असे चार दिवस पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जत्रा सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे होणार आहे.
महापालिकेच्या समाजविकास विभागामार्फत पवनाथडी जत्रेचे आयोजन
महापालिकेच्या समाजविकास विभागामार्फत दरवर्षी पवनाथडी जत्रा आयोजित केली जाते. शहरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांना मार्केटिंग कौशल्ये ज्ञात व्हावीत, महिला उद्योजिका तयार व्हाव्यात या हेतूने हा उपक्रम आयोजित केला जातो.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
सुविधेसाठी १ कोटी ३० लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे. जत्रेत एकूण ८०० स्टॉल असतील. त्यात विविध गृहोपयोगी उत्पादने, दैनंदिन वापराच्या वस्तू असतात.