Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

‘खंडणी मागाल तर मकोका लावणार’; अजित पवारांचा कडक शब्दात इशारा

Ajit Pawar | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर सध्या राज्यभरात चर्चा आहे. अशात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी बीडमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर बोलताना अजित पवार यांनी खंडणी मागणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, रिवॉल्व्हर घेऊन फिरणाऱ्यांचा परवाना रद्द करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यार असल्याचेही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

अजित पवार म्हणाले, की बीड सध्या सातत्याने चर्चेत आहे. अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नये. जिथे काही तथ्य असेल तिथे कारवाई करणार आहे. त्याचबरोबर विकास कामे करत असताना कोणी कोणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नये. जर असले प्रकार माझ्या कानावर आले तर मी मकोका लावायलाही मागे पुढे पाहणार नाही. यासाठी मी टोकाची भूमिका घेणार आहे. मी इथले अधिकारीही पाहणार आहे, इथे काही अधिकारी बऱ्याच वर्षांपासून आहेत, त्यामध्येही मी लक्ष घालणार आहे. असे करत असताना मी कोणताही भेदभाव करणार नाही.

हेही वाचा  :  सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर २१ फेब्रुवारीपासून ‘पवनाथडी’ जत्रा 

आपण पाहतो टीव्हीवर कधी कधी दाखवले जाते की, कोणी रिवॉल्व्हरने हवेत गोळीबार करते, कोणी कंबरेला रिवॉल्व्हर लावून फिरते. मी पोलीस प्रशासनाला सांगणार आहे, जो कोणी असले प्रकार करेल, त्याचा रिवॉल्व्हर परवाना रद्द करावा. रिवॉल्व्हर हे तुमच्या संरक्षणासाठी आहे. त्यामुळे तुम्ही जे रील वगैरे बनवाता ते मी खपवून घेणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button