प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात एक सूर, एक तालात देशभक्तीचा जल्लोष
वंदेमातरम गीताचा 150 वा वर्धापन दिन : विद्यार्थी-शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

पिंपरी-चिंचवड: बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित वंदेमातरम या अमर गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त आज चिंचवड येथील प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयात देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहिला. एक सूर, एक ताल या संकल्पनेतून बाराशेहून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सामुदायिक स्वरात वंदेमातरम गायन करून मातृभूमीबद्दलचे प्रेम आणि आदर व्यक्त केला.
1875 साली लिहिलेले वंदेमातरम हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्यात एकता आणि देशभक्तीचे प्रतीक ठरले असून आजही ते राष्ट्रगीताप्रमाणेच आदराचे स्थान राखते. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबविले जात आहेत.
हेही वाचा – ग्रामीण तरुणांना उज्ज्वल भविष्याची दिशा देणारे ‘आयआयबीएम’
महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन कमला एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्य संयोजन प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी केले. या उपक्रमात क्रीडा विभाग प्रमुख डॉ. शबाना शेख आणि डॉ. अभय पोद्दार यांनी विशेष परिश्रम घेतले. देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत झालेल्या या सोहळ्याने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमान आणि एकात्मतेचा संदेश पोहोचविला.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
“वंदेमातरम हे केवळ गीत नाही, तर आपल्या देशाच्या आत्म्याचा आवाज आहे. आजच्या पिढीने या गीतातून देशभक्ती, एकता आणि सामाजिक जबाबदारीची प्रेरणा घ्यावी, हाच या उपक्रमाचा खरा हेतू आहे.”
– दीपक शहा, सचिव, प्रतिभा ग्रुप.





