Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ग्रामीण तरुणांना उज्ज्वल भविष्याची दिशा देणारे ‘आयआयबीएम’

विभागप्रमुख अमोल भागवत यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

पिंपरी-चिंचवड : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअरच्या नव्या वाटा दाखविणारे आणि गेल्या १८ वर्षांपासून सातत्याने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे आयआयबीएम कॉलेज, चिखली (पुणे) आज हॉस्पिटॅलिटी शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य आणि विश्वासार्ह संस्था म्हणून ओळखले जाते.

हॉटेल मॅनेजमेंट, एअरलाइन्स, शिप मॅनेजमेंट, ट्रॅव्हल्स आणि टुरिझम अशा विविध क्षेत्रांत विद्यार्थ्यांना करिअरची दिशा देण्यात या संस्थेचे मोठे योगदान आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय वर्णेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘कमवा आणि शिका’ या योजनेद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळते. आज या संस्थेचे अनेक विद्यार्थी देश-विदेशातील नामांकित हॉटेल्स, क्रूझ शिप्स आणि एअरलाइन कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत, ही आयआयबीएमच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची ठोस पावती आहे.

संस्थेच्या या यशस्वी वाटचालीत विभागप्रमुख अमोल भागवत सर यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. मागील १४ वर्षांपासून ते आयआयबीएममध्ये HOD म्हणून कार्यरत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक नवे शैक्षणिक आणि प्रशासकीय उपक्रम राबविण्यात आले आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

हेही वाचा –  आधारशी पॅन लिंकिंगची मुदत 31 डिसेंबरपर्यंत, …अन्यथा पॅन होणार निष्क्रिय

८ नोव्हेंबर हा अमोल भागवत यांचा जन्मदिन असून, ते विद्यार्थ्यांमध्ये एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यशैलीत शिस्त, समर्पण आणि विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम नेहमीच दिसून येते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आणि महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एज्युकेशन मान्यताप्राप्त असलेले आयआयबीएम कॉलेज आज पिंपरी-चिंचवड व चिखली परिसरातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी करिअर घडविण्याचे एक प्रमुख केंद्र बनले आहे.

संस्थापक अध्यक्ष धनंजय वर्णेकर सर, प्राचार्य प्रदीप फुलकर सर, प्रशासकीय विभाग प्रमुख प्रतीक्षा डफळ मॅडम, विभाग प्रमुख अनिकेत वंजारी सर, संदीप जाधव सर तसेच सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी यांनी विभागप्रमुख अमोल भागवत सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणामध्ये अमर्याद क्षमता आहे; योग्य दिशा आणि संधी मिळाली तर तोही जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये यशस्वी होण्याची ज्योत असते; आमचे काम म्हणजे त्या ज्योतीला योग्य मार्गदर्शनाचा प्रकाश देणे.

– अमोल भागवत, विभागप्रमुख, आयआयबीएम.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button