Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणूक : राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना धक्का; भाजपाच्या बाळा भेगडेंनी बाजी मारली!

पुणे । विशेष प्रतिनिधी

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या समाधान अवताडे यांनी विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीपासून शेवटच्या काही फेऱ्यांपर्यंत हा सामना अगदी अटीतटीचा झाला. अखेर अवताडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार असणाऱ्या राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांचा तीन हजार ७१६ मतांनी पराभव केला.

या निवडणुकीच्या निमित्ता मावळ भाजपामध्ये उत्साह संचारला आहे. या निवडणुकीतील निकालांमुळे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांना धक्का मानला जात असून, मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी बाजी मारली असल्याची चर्चा मावळात सुरू झाली आहे.

वास्तविक, महाविकास आघाडीच्या नेत्यांसह मावळमधील राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली होती. पंढरपूर येथे तळ ठोकून भगिरथ भालके यांचा प्रचार केला होता. कारण, सुनील शेळके यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि मावळचे माजी आमदार बाळा भेगडे या निवडणुकीचे प्रभारी होते. त्यामुळे भेगडे आणि शेळके यांच्यातील राजकीय युद्ध पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पहायला मिळाले.

सुनील शेळके पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक होते. मात्र, मावळप्रमाणे पंढरपुरात शेळके आपला चमत्कार दाखवू शकले नाहीत.

आवताडे- परिचारक गट एकत्र आल्यान विजय…

भाजपने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केल्याने भेगडे हे १५ दिवस पंढरपूरात तळ ठोकून होते. शेवटी त्यांना कोरोनाने गाठल्यामुळे मतदानाच्या दिवशी आपल्या घरी तळेगांव दाभाडे येथे (ता.मावळ, जि. पुणे) ते परतले होते. ही पंढरपूरची पोटनिवडणूक महाविकास आघाडी सरकारविरुद्ध जनेतेच्या रोषाची भावना व्यक्त करणारी होती, असे सांगत आतापर्यंतच्या निवडणूका  एकेमकांविरोधात लढलेले आवताडे आणि परिचारक गट यावेळी भाजपच्या झेंड्याखाली एकत्र आल्याने आमचा विजय निश्चित झाला आहे, असे बाळा भेगडे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button