ताथवडे –पुनावळेतील महिलांसाठी रंगणार खेळ पैठणीचा
![Paithani game to be played for Tathawade-Punawale women](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Image-2021-12-15-at-1.19.30-PM.jpeg)
सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांच्यातर्फे उपक्रमाचे आयोजन
ताथवडे | परिसरातील महिलांसाठी खास होम मिनिस्टर अर्थात खेळ रंगला पैठणीचा या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि.१९) हा कार्यक्रम होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांच्यातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुनावळेतील मधुरा ल़ॉन्स येथे रविवारी (दि.१९) सायंकाळी सहा वाजता मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर, अभिनेता अभिजित खांडकेकर असणार आहेत. कार्यक्रमातील प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तर प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकास एक तोळ्याचा नेकलेस, मानाची पैठणी, आठ ग्रॅम सोन्याची ठुशी व मानाची पैठणी, तृतीय क्रमांकास सहा ग्रॅम सोन्याची ठुशी व मानाची पैठणी, चतुर्थ क्रमांकास तीन ग्रॅमची ठुशी व मानाची पैठणी आणि पाचव्या क्रमांकास दोन ग्रॅमची ठुशी व मानाची पैठणी देण्यात येणार आहे.
जास्तीत-जास्त महिलांनी या खेळात सहभागी होऊन भरघोस बक्षीस जिंकावेत असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार यांनी केले आहे.