मनसे अध्यक्ष ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
![Non-bailable warrant against MNS president Raj Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/235794-raj-thakre485.jpg)
- मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांची माहिती
पिंपरी : मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा उद्या 14 जून 2021 रोजी आपला 53 वा वाढदिवसनिमित्ताने पिंपरी चिंचवड मनसेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मनसे नेते गणेश सातपुते, रणजित शिरोळे, किशोर शिंदे यांना प्रमुख उपस्थिती म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.
असे आहे उपक्रमाचे नियोजन
1) सोमवार दि.14/6/2021 रोजी सकाळी 09:00 वाजता सेक्टर 22, राहुलनगर,निगडी येथे वृक्षारोपणचा कार्यक्रम शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
2) पिंपरी विधानसभेचे विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे यांच्या वतीने रामनगर,चिंचवड येथे सकाळी 11 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
3) चिंचवड विधानसभेचे निलेश नेटके यांच्या वतीने प्रभाग क्र.22 काळेवाडी आदर्श नगर मध्ये सूचना फलकाचा अनावरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
4) महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेतर्फे वृद्धाश्रमामध्ये दुपारी 12 वाजता फळवाटप करण्यात येणार आहे.
5) महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभागातर्फे चिंचवड येथील गोशाळामध्ये दुपारी 1 वाजता 700 kg चारा वाटपाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे.
6) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सचिव अक्षय नाळे यांच्या वतीने प्रभाग क्र. 17 मध्ये साय: 6 वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
7) महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे मदर तेरेसा अनाथ आश्रम, काळभोरनगर येथे दुपारी 01:00 वाजता धान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात येणार आहे.
8) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन शिंगाडे,विनोद भंडारी,राजू येवते यांच्या वतीने प्रभाग क्र.16 किवळे, रावेत या ठिकाणी वृक्षारोपण तसेच गरजू लोकांना चादर वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.
पर्यावरण संवर्धन सायकल फेरीला मनसे नगरसेवक सचिन चिखले यांनी दिल्या शुभेच्छा!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दिघी – पावना धरण – दिघी या पर्यावरण संवर्धन सायकल फेरीला मनसे शहरअध्यक्ष सचिन चिखले यांनी सायकलपटू दत्ता घुले यांना शुभेच्छा दिल्या, यावेळी मनसेचे प्रमुख पदाधिकारी रुपेश पटेकर, बाळा दानवले, राजू साळवे, हेमंत डांगे, राजू भालेराव, सुशांत साळवी, महिला सेनेच्या सिमा बेलापूरकर आदी उपस्थित होत्या.