भोसरी महोत्सवात भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन : ॲड. नितीन लांडगे; अशोक सराफ, निर्मिती सावंत यांची उपस्थिती
![Organized many cultural programs in Bhosari festival: Adv. Nitin Wolfe; Presence of Ashok Saraf, Nirvana Sawant](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Ashok-Saraf-pic.jpg)
पिंपरी | भोसरी कला, क्रीडा रंगमंचच्यावतीने गुरुवार, 1 सप्टेंबरपासून ते सोमवार, 5 सप्टेंबरपर्यंत “भोसरी महोत्सव २०२२” चे आयोजन करण्यात आले आहे.यावर्षीच्या महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी, 1 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजता आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती भोसरी कला, क्रीडा मंचचे अध्यक्ष व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
भोसरीतील कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृहात गुरुवारी सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील भूषवणार आहेत. तर माजी खासदार अमर साबळे, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निर्मिती सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.यावेळी माजी आमदार व शहराचे प्रथम महापौर ज्ञानेश्वर लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे, माजी नगरसेवक वसंतनाना लोंढे, अण्णासाहेब मगर बँकेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब गव्हाणे, पवना बँकेचे शामराव फुगे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संतोष लोंढे, माजी नगरसेविका भीमाताई फुगे, सोनाली गव्हाणे, नम्रता लोंढे, सारिका लांडगे, माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे, सागर गवळी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सिंह, कविता भोंगाळे आदी उपस्थित राहणार आहेत.
तसेच या उद्घाटन सोहळ्यानंतर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचे धमाल विनोदी नाटक “व्हॅक्यूम क्लिनर” सादर करण्यात येणार आहे.तसेच छायाचित्रकार नंदू लोंढे यांच्या लेह लडाख येथील छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या महोत्सवात सर्वांना मुक्त प्रवेश आहे.
1 सप्टेंबरपासून भोसरी महोत्सवात नाटक, काव्य मैफल, लावणी, छायाचित्र प्रदर्शन, कलाकारांशी गप्पा अशा भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांसह नृत्य स्पर्धा, भोसरी सौंदर्यवती व कराओके आयडॉल स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देवून गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष विजय फुगे, उपाध्यक्ष भरत लांडगे, सचिव सुनील लांडगे व समिती सदस्यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
शुक्रवारी, 2 सप्टेंबर ला सायंकाळी 4 वाजता सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक, कवी सौमित्र तथा किशोर कदम यांच्या उपस्थितीत काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.त्याचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवी म. भा. चव्हाण तर प्रमुख उपस्थिती बंडा जोशी यांची राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपा शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात, जिल्हा सरचिटणीस राजू दुर्गे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, उद्योजक कार्तिक लांडगे, माजी नगरसेवक विश्वनाथ लांडे, उद्योजक शैलेश मोरे, नंदुशेठ दाभाडे, माजी नगरसेवक दत्ता गायकवाड, अमृत पऱ्हाड, महादेव गव्हाणे, अंकुश पठारे आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
शनिवारी, 3 सप्टेंबर ला सकाळी 10 वाजता आंतरशालेय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना व उत्तेजनार्थ संघांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.यावेळी माजी नगरसेविका सुनंदाताई फुगे, सोनाली गव्हाणे, शुभांगी लोंढे, अनुराधा गोफणे, बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, समाजसेविका नीलमताई लांडगे, उद्योजक नरेंद्र सिंह आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच सरदार मारुती गोळे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
सायंकाळी 5 वाजता आमदार उमाताई खापरे यांच्या उपस्थितीत “भोसरी सौंदर्यवती” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पूजाताई महेश लांडगे, माजी नगरसेविका उज्वलाताई गावडे, समाजसेविका राजश्री घागरे, रेखा गव्हाणे आदी उपस्थित राहणार आहेत.
रविवारी, 4 सप्टेंबर ला सायंकाळी 5 वाजता “भोसरी कराओके आयडॉल” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत वय वर्ष 18 पासून पुढील स्पर्धकांनी सहभाग घ्यावा.विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचे परीक्षण गायक, संगीतकार अक्षय लोणकर करणार आहेत. तर प्रमुख उपस्थिती म्हणून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडीगेरी, माजी नगरसेवक पंडितशेठ गवळी, अण्णासाहेब मगर बँकेचे नंदूशेठ लांडे, उद्योजक अभय लायगुडे, राष्ट्रीय खेळाडू राजू घुले उपस्थित राहणार आहेत.
या “भोसरी महोत्सव २०२२” चा समारोप सोमवारी, 5 सप्टेंबर ला सायंकाळी 5 वाजता खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यावेळी माजी आमदार विलास लांडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी उपमहापौर सुदाम लांडगे, माजी नगरसेवक रवीभाऊ लांडगे, संजय वाबळे, विक्रांत लांडे, जालिंदर शिंदे, कैलासशेठ भांबुर्डेकर, सामाजिक कार्यकर्ते तुषार सहाने, आदी उपस्थित राहणार आहेत.
तत्पूर्वी दुपारी 4 वाजता “बॉईज 3” या चित्रपटातील कलाकार पार्थ भालेराव, शुभम शिंदे, प्रतीक लाड, विदुला चौघुले, गिरीश कुलकर्णी, शर्वरी जमेनीस यांच्याशी गप्पाटप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच मुख्य समारोप समारंभ नंतर सायंकाळी सहा वाजता लावणी कलाकार पूनम कुडाळकर आणि सीमा पुणेकर यांच्या लावण्यांचा “तुमच्यासाठी काय पण” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अशीही माहिती भोसरी कला, क्रीडा मंचच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आली आहे.