ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड : नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

माजी नगरसेविका नम्रता लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीत आयोजन

पिंपरी : भारतीय जनता पार्टीच्या माजी नगरसेविका नम्रता लोंढे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. या निमित्त मोफत फिटनेस शिबिर तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. फिटनेस शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. तर मोफत आरोग्य तपासणी शिबिर उद्या मंगळवारी (दि. 3) आयोजित केले आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन लोंढे यांनी केले आहे.

माजी नगरसेविका नम्रता लोंढे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. या वर्षी देखील या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नुकतेच फिटनेस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल वेलनेस प्रशिक्षक अर्जुन सुसे यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी नागरिकांना व्यायामाचे महत्त्व सांगून सराव करून घेतला. या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या बरोबरच मंगळवारी (दि. 3) सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे.

हेही वाचा – भारतातल्या चलनी नोटांवर महात्मा गांधींजींचा फोटो का असतो?

इंद्रायणीनगर, भोसरी येथील मेडिकव्हर हॉस्पीटल येथे हॉस्पीटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने हे शिबिर पार पडणार आहे. यामध्ये बीएमआय तपासणी, नाडी, उच्च रक्तदाब, बीएसएल-आर, ईसीजी, सीटी स्कॅन, एमआरआय (वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार), नेत्र, कान-नाक-घसा तपासणी करण्यात येणार आहे. तसेच काही समस्या असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार देखील केले जाणार आहेत.

या आरोग्य शिबिरामध्ये हॉस्पीटलतर्फे मित्रा कार्ड देण्यात येणार आहे. ज्यामध्ये हॉस्पीटलमध्ये मिळणार्‍या सुविधांमध्ये अतिरिक्त सवलत देण्यात येणार असल्याची माहिती लोंढे यांनी दिली. या शिबिरास जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगरसेविका नम्रता लोंढे, योगेश लोंढे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button