रिक्षातून घेऊन जात एकाला लुटले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Marhan-3.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
जबरदस्तीने रिक्षातून घेऊन जात पाच जणांनी मिळून एका व्यक्तीला लुटले. ही घटना सोमवारी (दि. 14) रात्री सव्वा बारा वाजता पवळे ब्रिजजवळ, निगडी येथे घडली.
धनराज प्रभाकर जगताप (वय 41, रा. लोणावळा) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बाळू मारुती रसाळ (वय 27, रा. निगडी), लखन मच्छिंद्र तुपे (वय 27, रा. निगडी), महेश गौतम शिंदे (वय 25, रा. निगडी) आणि अन्य दोघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पवळे ब्रिज निगडी येथे थांबले असताना आरोपींनी त्यांना जबरदस्तीने रिक्षात बसवून यमुनानगरच्या दिशेने नेले. एका आरोपीने रिक्षाला दुचाकी आडवी लाऊन फिर्यादी यांना खाली उतरवून दमदाटी करत मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडील साडेचार हजार रुपये आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.