ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिस्टल, दोन जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
![One arrested for carrying pistol, two live cartridges](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Pistol-arrested.jpg)
पिंपरी चिंचवड | पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी पिरंगुट येथील एकाला अटक करण्यात आली आहे. ऐलोरा वाईन्स जवळ, बावधन येथे शुक्रवारी (दि.17) खंडणी विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतले.प्रताप उर्फ बाळ्या हनुमंत पवार (वय 29, रा. पिरंगुट, ता. मुळशी) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपीने विनापरवाना 40 हजार 400 रुपये किंमतीचे लोखंडी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूस जवळ बाळगली होती. आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.