उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त तब्बल ५३ हजार वृक्षारोपण महाअभियान
भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा पुढाकार : विविध उपक्रमांद्वारे शहरात ‘सेवा दिवस’ उत्साहात
![On the occasion of the 53rd birthday of Deputy Chief Minister Devendra Fadnavis, as many as 53 thousand tree plantation campaign](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Shankar-Jagatap-Pimpri-Chinchawad-780x470.jpg)
पिंपरी : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिनी पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे ‘वृक्षारोपण महाअभियान’ हाती घेण्यात आले आहे. त्या माध्यमातून परिसरात तब्बल ५३ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, प्रगतशील विकासाचे शिल्पकार मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने ‘‘सेवाकार्याचे आयोजन करण्यात आले. पिंपळे निलख विशाल नगर येथे या अभियानाची सुरवात करण्यात आली.
याप्रसंगी आमदार उमाताई खापरे, माजी राज्यसभा खासदार अमर साबळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा सदाशिवजी खाडे, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, मा.महापौर माई ढोरे, मा.सत्तारूढ पक्षनेते नामदेवजी ढाके, मा.नगरसेविका आरती चोंधे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, भाजपा निमंत्रित सदस्य संतोष कलाटे, पिंपरी विधानसभा निवडणुक प्रमुख अमित गोरखे, सरचिटणीस भाजपा राजू दुर्गे, मंडल अध्यक्ष योगेश चिंचवडे, भाजपा नेते सचिन साठे, भाजयुमो शहराध्यक्ष संकेत चोंधे, सामाजिक कार्यकर्ते गणेश कस्पटे, नितीन इंगवले, रणजीत कलाटे संजय दळवी, भुलेश्वर नांदगुडे पाटील, अनिल शेठ संचेती, मोहन शेठ कस्पटे, श्याम दंडे, काळुराम नांदगुडे, नागेश जाधव, बाळासाहेब इंगवले, सागर चौधरी, कछेश्वर साळुंखे, अरविंद शिरोडे, सुहास कस्पटे पिंपळवण ग्रुपचे चंद्रकांत ओवले, संदीप बोडके, विक्रम चाचकर, विनोद बोडके, गणेश गोमणे , स्वाती कुंभार, सोनाली पासलक, शिवगंगा सरोटे, संदीप शेटे, प्रतापराव भोसले, रोहित अहिरे, बाळू कजबे तसेच भाजपा पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख, कार्यकर्ते आणि पिंपळे निलख येथील विद्या निकेतन विद्यालयातील मुख्याध्यापक आनंद गर्जे सर व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.
शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, शहर आणि परिसरात पर्यावरणाचे रक्षण, राष्ट्राचे संरक्षण या संकल्पनेतून तब्बल ५३ हजार ऑक्सिजनपूरक वृक्षांची लागवड करण्याचे महाअभियान राबविण्यात आले आहे. तसेच, आधार कार्ड अपडेट सुविधा केंद्र अभियान, मोफत आरोग्य सेवा असे उपक्रम आयोजित केले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्त राज्यभर सेवादिवस साजरा करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ आणि सुंदर बनवण्याचा संकल्प केला असून, आगामी काळात पर्यावरणपुरक उपक्रमांवर भर देण्यात येणार आहे. या सेवा दिवसाच्या निमित्ताने भाजपाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आप आपल्या कार्यक्षेत्रात सेवा उपक्रमात सहभागी झाले आहेत.
– शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.