77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पावन पर्वावर मोरया शिक्षण संस्थेच्या संस्थापिका स्वर्गीय श्रीमती शकुंतला माटे बाईंच्या आठवणींवर आधारित ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न.

चिंचवड : चिंचवड येथील श्रीधर नगर मधील मोरया शिक्षण संस्थेच्या संस्थापिका स्वर्गीय श्रीमती शकुंतला माटे यांच्या जीवन कार्य व आठवणींवर आधारित ज्ञान संस्कार आणि आठवणींनी समृद्ध अशा एका भावस्पर्शी ग्रंथाचे प्रकाशन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्य न्यायाधीशांचे वकील, मोरया शिक्षण संस्थेचे कायदेशीर सल्लागार असलेले मा.एडवोकेट डॉ .राजेंद्र गोडबोले यांच्या हस्ते संपन्न झाले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोरया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. स्वप्निल शेडगे हे होते तसेच मोरया शिक्षण संस्थेच्या कार्यवाह , तहयातविश्वस्त, प्राचार्या व संस्थापिका माटे बाई यांच्या कन्या माननीय सौ .इंद्रायणी माटे -पिसोळकर, संस्थेचे खजिनदार श्री. रणजीत सावंत, संस्थेचे सदस्य श्री. अभिषेक देव ,संस्थेचे पदाधिकारी ,शिक्षक वर्ग आजी-माजी विद्यार्थी पालक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते एमएसएस हायस्कूल चे उप मुख्याध्यापक श्री दिलीप कुमावत, पर्यवेक्षिका सौ मैत्री राजे, शिक्षक समन्वयक श्री संजय खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा – एम एस एस हायस्कूलमध्ये 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

सदर पुस्तकात संस्थापिका स्वर्गीय शकुंतला माटे बाईंच्या संघर्षमय जीवन प्रवासासह, शैक्षणिक, व सामाजिक ,क्षेत्रातील योगदानाचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे .संस्थेच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतचा प्रवास, मूल्याधिष्ठित शिक्षणाचा दृष्टिकोन ,व समाजासाठी केलेले कार्य याबद्दल त्यांच्या त्या वेळचे सहकारी माजी शिक्षिका ,नातेवाईक, मुली, संस्था सदस्य, शिक्षक ,विद्यार्थी, पालक ,यांनी स्वतः लेख लिहिल्या असून त्यातून माटेटेबाईंचा स्वभाव ,कार्य प्रणाली ,शैक्षणिक, व सामाजिक कार्य ,भावनिकता, देशप्रेम असे एक एक पहिलीची उकल त्याद्वारे करण्यात आली आहे.

पुस्तक प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे माननीय श्री एडवोकेट डॉ.राजेंद्र गोडबोले यांनी माटेबाईंच्या च्या दूरदृष्टीचा गौरव करत त्यांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. हे पुस्तक भावी पिढीला दिशादर्शक ठरेल असे त्यांनी नमूद केले
मोरया शिक्षण संस्थेच्या कार्यवाह, तहयात विश्वस्त, प्राचार्य एम. एस .एस .हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, त्यांची कन्या प्राचार्या सौ. इंद्रायणी माटे पिसोळकर यांनी आपल्या मनोगतात स्वर्गीय शकुंतला माटे हे फक्त नाव नाही तर एक विचार आहे, एक तत्त्व आहे तो विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या पुस्तक ग्रंथ प्रकाशन करण्याचा घाट घातला गेला त्यातून समाजातील सर्व घटकांना दिशा मिळेल असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका सो . मैत्रेयी राजे यांनी केले तर सौ. उपशिक्षिका प्राची जोशी यांनी आभार मानले.




