breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधनपर्वाचे आयोजन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दिनांक ०१ ऑगस्ट ते ०५ ऑगस्ट या कालावधीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधनपर्वात व्याख्याने, पोवाडे, लोककला, परिसंवाद, ऑर्केस्ट्रा, वृक्षारोपण, रोजगार मार्गदर्शन, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण, ग्रंथदिंडी, असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ५ दिवस निगडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक परिसरात घेण्यात येणार आहे.

१ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय भवनात तसेच भक्ती शक्ती, निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता चंदन कांबळे प्रस्तुत स्वर चंदन या गीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात येणार असून सकाळी ११.००  वाजता पल्लवी घोडे हे  प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर  करतील. दुपारी १२.३० वाजता साहित्याचा राजा अण्णा माझा हा कार्यक्रम राजू जाधव हे सादर करतील. दुपारी १.३० वाजता मयूर खुडे प्रस्तुत ही चंद्राची चांदणी या प्रबोधनपर गीतांचे देखील आयोजन करण्यात आले आहे, त्यानंतर दुपारी ३.०० वाजता बँन्ड स्पर्धा होणार आहे. सायंकाळी ५ वाजता प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम कोमल पाटोळे सादर करणार आहे. सायंकाळी ६ वाजता गीते अण्णाभाऊंची हा कार्यक्रम साजन बेंद्रे आणि विशाल चव्हाण हे सादर करतील. त्यानंतर रात्री ८ वाजता ज्ञानेश कोळी प्रस्तुत ५० कलाकारांचा भूपाळी, वाद्यमुखी, पिंगळा, वासुदेव, कलास्पर्धा, जोगवा अशा महाराष्ट्रीय संस्कृतीचे दर्शन घडवणा-या भव्य कार्यक्रमाने प्रबोधन पर्वाच्या पहिल्या दिवसाची सांगता होईल.

शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी सनई वादनाने प्रबोधन परवाच्या दुस-या दिवसाची सुरुवात होईल. सकाळी ९ वाजता शाहिरी गरजली अण्णांची हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम संजय मगर, शाम चंदनशिव हे सादर करतील. सकाळी १०.३० वाजता स्वरगंधर्व प्रोडक्शन प्रस्तुत समाज प्रबोधनपर कार्यक्रम पांडुरंग गायकवाड सादर करतील.  दुपारी १२ वाजता म्युझिक ऑफ बॉलीवूड हा  कार्यक्रम अमीर शेख हे सादर करणार आहे, दुपारी १.३० वाजता लेखणीचा बादशाह बापू पवार शाहिरी कार्यक्रम सादर करतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर क्रांतिकारी विचारांचा प्रसार व प्रचार या विषयावर डॉ. संभाजी बिरजे, रमेश पांडव, बालाजी कांबळे, सुभाष खिलारे, सोमनाथ कद, आचार्य रतनलाल सोनाग्रा हे संवाद साधतील.  सायंकाळी ५ वाजता सुरप्रित अशोक हे गझल गायनाने  साहित्यरत्नास अभिवादन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७  वाजता आईसाहेब प्रोडक्शन प्रस्तुत सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रबोधनपर्वाच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची  सांगता होईल.

हेही वाचा –  संस्थात्मक पिककर्ज प्रणालीबाहेरील आदिवासी शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करावा; अजित पवार यांचे निर्देश

शनिवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता मराठमोळ्या गाण्यांचा कार्यक्रम मिठू पवार हे सादर करतील. त्यानंतर सकाळी १० वाजता पठ्ठा लहुजींचा या प्रबोधनात्मक गीतांचा जंगी कार्यक्रम लखन अडागळे सादर करतील. सकाळी १२ वाजता प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम “मी होणार सुपरस्टार फेम” ज्ञानेश्वरी कांबळे आणि निलेश देवकुळे हे सादर करतील. दुपारी ३.  वाजता परिसंवाद ठेवण्यात आला आहे. परिसंवादाचा विषय समाजातील युवक व युवतींची राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती हा असून यामध्ये सचिन अडागळे , भूषण ओझर्ड ,  संतोष कसबे , डॉ. साबळे पांडूरंग , प्रा. प्रदीप कदम यांचा सहभाग असेल. सायंकाळी ५ वाजता  “स्नेह शितल इव्हेंटस” हा कार्यक्रम  शितल चव्हाण सादर करतील. रात्री ६.३० वाजता  लोकशाहीर अण्णा भाऊ साठे   या नाटकाचे आयोजन करण्यात आले असून  नाटक  राजपाल वंजारी हे सादर करतील. त्यानंतर रात्री ८ वाजता ऑर्केस्टा वर्ल्ड म्युझिक या कार्यक्रमाने प्रबोधनपर्वाच्या तिस-या दिवसाच्या कार्यक्रमाचा  समारोप होईल.

रविवार, ४ ऑगस्ट या प्रबोधनपर्वाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात सकाळी ९ वाजता वाद्यावुंदासह गीत गायनाच्या कार्यक्रमाने होईल. हा कार्यक्रम अमर पुणेकर हे सादर करतील. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता सांगीतिक अविष्कार क्रांतीचा एल्गार हा कार्यक्रम बालशाहीर  विकास येडके हे सादर करतील. सकाळी ११.३० वाजता स्वर्ण लहरी या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम अनिकेत जवळेकर हे सादर करतील. त्यानंतर दुपारी १.००  वाजता के.डी. कड प्रस्तुत  ऑल इन वन मनोरंजनाचा खेळ रंगला हा महिलांचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाला अ,ब,क,ड च्या आरक्षणाची गरज व वर्गीकरणाची आवश्यकता (अटी) असा परिसंवादाचा विषय असून अविनाश बागवे,  भगवानराव वैराट , खंडदेव कटारे, अंबादास सगर, उल्हासदादा पवार यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी ५ वाजता अण्णा भाऊंची गीते हा कार्यक्रम राहुल शिंदे हे सादर करतील. सायंकाळी  ६ वाजता सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांचा सूर पल्लवी इव्हेंट्स आयोजित गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री ८ वाजता जयेदू मातोश्री प्रॉडक्शन प्रस्तुत थोरवी अण्णाची या  लोक गीतांच्या कार्यक्रमाने  चौथ्या दिवसाची सांगता होईल.

सोमवार, सकाळी  ९ वाजता  आनंद सृष्टी हा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम नंदकुमार नेटके आणि अभिजीत राजे सादर करतील.  सकाळी  १०.३० वाजता गीते अण्णा भाऊंची हा कार्यक्रम महेंद्र बनसोडे आणि सहकारी सादर करतील. सकाळी ११.३० वाजता असा आमचा साहित्य सम्राट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण चित्रसेन भवार करणार आहे. दुपारी १ वाजता स्वरगंध प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता “आठवण अण्णांची गीतगायनाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम बाळासाहेब निकाळजे सादर करतील. दुपारी ३ वाजता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान व मातंग समाजाचा गौरवशाली इतिहास हा या परिसंवादाचा विषय असेल. यामध्ये जालिंदर कांबळे ,  दादा महाराज पाटोळे , वर्षा डहाळे, संदीपान झोंबाडे यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी ५ वाजता प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम स्वाती महाडिक आणि सहकारी सादर करतील.  सायंकाळी ५.३० वाजता आपले अण्णा भाऊ हा कार्यक्रम सादर करण्यात येईल. यामध्ये आपले अण्णाभाऊ या विषयावर ज्येष्ठ अभिनेते व मुलाखतकार राहुल सोलापुरकर व्याख्यान देणार आहेत. सायंकाळी ७.००  वाजता एस.के. प्रॉडक्शन प्रस्तुत साहित्याचा कोहिनूर हिरा – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधनात्मक गीते,लोककला,लोकगीते,मुजरे हा विविध पंचरत्न कार्यक्रम  एस.के. प्रोडक्शन द्वारे सादर करण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीचे औचित्य साधून त्यानिमित्त १०४ रोपट्यांचे वृक्षारोपण, १०४ ग्रंथांची ग्रंथदिंडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामध्ये १०४ वारकरी सहभागी होणार आहेत, तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, रोजगार व व्यवसाय मार्गदर्शन, समाज विकास विभाग विविध योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आदी बाबत माहिती कक्षाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button