धुराजी शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
![Officials including Dhuraji Shinde join NCP Sharad Chandra Pawar party](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Dhuraji-Shinde-780x470.jpg)
पिंपरी | रिपब्लिकन सेना पश्चिम महाराष्ट्राचे युवाअध्यक्ष धुराजी शिंदे यांनी आपल्या सहकारी पदाधिकाऱ्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते व असंघटित कामगार प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांचे उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.
धुराजी शिंदे यांनी पश्चिम महाराष्ट्र सह पिंपरी चिंचवड शहरातील विविध घटकांसोबत यशस्वी काम केलेले असून शहराध्यक्ष म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. पिंपरी येथील माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे स्मारकासाठी त्यांचा १० वर्षांपासुन सातत्याने अंदोलन मोर्चासह पाठपुरावा केला आहे. त्यांचे सोबत रिपब्लिकन सेनेचे युवा अध्यक्ष अरुण मैराळे, सामजिक कार्यकर्ते दिनकर सोमवंशी, सामाजिक कार्यकर्ते दिपक सुधाकर वारभुवन यांचसह अनेकानीं प्रवेश केला.
हेही वाचा – ‘ओबीसी समाजाची बैठक ‘मॅनज’ होती’; मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप
देशाचे नेते शरदचंद्र पवार, कार्यक्षम प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, असंघटीत कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांचे मार्गदर्शनात पुढील कालावधीमध्ये अत्यंत चांगले काम करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पक्षाची सर्वसामान्यांना, बहुजनांना न्याय देण्याची भूमिका आहे त्यामुळे या पक्षात चांगल्या पद्धतीने काम करत रहाणार अशी प्रतिक्रिया धुराजी शिंदे यांनी दिली.