सावली निवारा केंद्रातील सुविधेचा अधिकारी संभाजी ऐवले यांनी घेतला आढावा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/20210316_123733-scaled.jpg)
नागरिकांशी साधला संवाद, सुविधेबाबत कर्मचा-यांना दिल्या सूचना
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरू केलेल्या पिंपरीतील सावली निवारा केंद्राला नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी आज भेट दिली. तेथील सुविधा नागरिकांना मिळणारी वागणूक, जेवनाची व्यवस्था, पिण्याचे पाणी आदींचा त्यांनी आढावा घेतला. तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या चेह-यावर खळखळणारा आनंद पाहून समाधान मिळत असल्याची भावना अधिकारी ऐवले यांनी व्यक्त केली.
नागरवस्ती विकास योजना विभागाद्वारे पिंपरीतील भाजी मंडई पिंपरी 18 याठिकाणी सावली निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरामधील भिक्षेकरी, निराधार, भटकंती करत शहरात आलेल्या नागरिकांना याठिकाणी निवारा दिला जातो. ज्यांना कोणीच नाही, त्यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेने राहण्यासाठी उत्तम सुविधा केली आहे. याठिकाणी आज 45 नागरिकांची नोंद करण्यात आली. त्यामध्ये 34 पुरूष तर 11 महिला आहेत. 8 लोकांचा स्टाफ आहे. याठिकाणी मनोरुग्ण, मुकबधीर, अपंग, वयोवृध्द, निराधार, ज्यांना कोणीच नाही असे नागरिक देखील राहण्यासाठी आहेत. अशा दुर्लक्षीत लोकांची पालिकेने निवारा केंद्रात राहण्याची उत्तम सोय केली आहे. त्यामध्ये कलाकार, संगीत वाद्य वादक अशा कलेची जोपासणा करणा-या नागरिकांचा समावेश आहे.
समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी आज याठिकाणच्या व्यवस्थेबाबत खातरजमा केली. येथील नागरिकांना व्यवस्थित भोजन दिले जाते का, शुध्द पिण्याचे पाणी दिले जाते का, नागरिकांना आराम करण्याची सुविधा आहे का, त्यांना चहा-नाष्टा-जेवन वेळेवर दिले जाते, त्यांची स्वच्छता कशी घेतली जाते, आरोग्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे लक्ष दिले जाते का याची माहिती त्यांनी घेतली. कोणत्याही प्रकारची अडचण आली तर माझ्याशी संपर्क साधण्याची सूचना देखील त्यांनी तेथील कर्मचा-यांना केली. यावेळी निवारा केंद्रातील महिला व पुरूष रहिवाशांसोबत त्यांनी संवाद साधला. त्यांची प्रकृतीची विचारपूस केली. त्यावर आमच्या घरी देखील अशी व्यवस्था केली जात नव्हती, अशी प्रतिक्रिया रहिवाशांनी दिली.
—————————–
भटकंती करत पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या विराधार व्यक्तींना माझे या जगात कोणीच नाही, ही भावना मनामध्ये निर्माणच होऊ नये यासाठी पालिकेच्या माध्यमातून सावली निवारा केंद्राची सोय केली. येथील दैनंदीन कामाचा आढावा प्राधान्याने घेतला जातो. शहरात रस्त्याच्या कडेला फुटपाथवर, बस स्थानकात, रेल्वे स्थानकात बसलेल्या निराधार नागरिकांना उचलून आणून याठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था केली जाते. अशा अनेक नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. येथील निराधार नागरिकांच्या चेह-यावरचा आनंद पाहून मनाला समाधान मिळते.
संभाजी ऐवले, समाज विकास अधिकारी, नागरवस्ती विकास योजना विभाग, पिंपरी-चिंचवड मनपा