Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आता अत्याधुनिक कॅमेऱ्यांद्वारे पिंपरी-चिंचवडवर नजर

पिंपरी : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेले २,५७० ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचे जाळे शहरात उभारण्यात येत आहे. गर्दीची ठिकाणे, महत्त्वाचे चौक, अपघातप्रवण क्षेत्र आदी ठिकाणांवर अत्याधुनिक कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका, स्मार्ट सिटीने वोक्सारा टेक्नो सोल्युशन कंपनीच्या सहकार्याने शहरातील विविध भागांमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविले आहेत. या संपूर्ण प्रणालीवर देखरेख करण्यासाठी निगडीत नियंत्रण कक्ष उभारला आहे. चिंचवड स्टेशन, इंद्रायणीनगर, आकुर्डीतील खंडोबा माळ चौक, निगडीतील टिळक चौक, प्रभाग कार्यालये, रुग्णालये, शाळा, उद्याने, बीआरटी मार्ग अशा जवळपास ६०६ ठिकाणी कॅमेरे बसविले आहेत. त्याद्वारे अपघात, आक्षेपार्ह गोष्टींवर करडी नजर ठेवली जात आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन, अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हे कॅमेरे उपयुक्त ठरणार आहेत.

हेही वाचा    –      धक्कादायक घटना! महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवले 

एएनपीआर आरएलव्हीडी प्रकारात मोडणारे हे ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे अत्याधुनिक प्रणाली वापरून बनविले आहेत. त्यातील प्रणाली २४ तास कार्यरत राहून, ३६० अंशांमधील घडामोडी चित्रित करू शकते. त्यामुळे शहरात घडणाऱ्या सर्व घडामोडींचे बारकाव्याने चित्रीकरण केले जाऊ शकते. प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या प्रकल्पामुळे आतापर्यंत ३१० हून अधिक अपघात व विविध आक्षेपार्ह घटना चित्रीकरणामुळे उघडकीस आल्या आहेत. पोलिसांनाही याची मदत होत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आतापर्यंत ३० पेक्षा अधिक तक्रारी निकाली काढल्या आहेत. वाहतूक नियम मोडल्यामुळे सात हजार जणांना ई-चलनाद्वारे दंड ठोठावला आहे. शहरातील उर्वरित भागातही आणखी ७३० कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यामुळे महापालिका आणि शहरातील वातावरण सुरक्षित ठेवण्यास मदत होणार असल्याचा दावा वोक्सारा टेक्नो सोल्युशनच्या संचालिका सायली लाड यांनी केला.

या उपक्रमामुळे वाहतूक नियमन सुधारणे, नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण तयार होण्यास हातभार लागणार असल्याचे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button